maharashtra corona cases

लोणी काळभोर: लोणी काळभोरसह उरुळी कांचन,थेऊर, कुंजीरवाडी व कदमवाकवस्ती या प्रमुख ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाने चांगलाच धुमाकुळ घातला आहे. पुर्व हवेलीमधील सात प्रमुख ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाचे तब्बल ३७ नवीण रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोनाने जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुर्व हवेलीमधील उरुळी कांचन, लोणी काळभोर, थेऊर, कुंजीरवाडी व कदमवाकवस्ती या  ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाने चांगलाच धुमाकुळ घातला होता. याच दरम्यान पुणे शहरसह  लगतच्या विविध ग्रामपंचायत हद्दीत लॉकडाऊन लादल्याने, मागील दहा दिवसात कोरोना आटोक्यात आल्याचे दिसून येत होते. पुर्व हवेलीमधील विविध गावात कोरोनाचे रुग्ण हातावर मोजता येतील या संख्येत आढळुन येत होते. मात्र मागील चार दिवसापासुन कोरोनाने पुन्हा एकदा वेगाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी दिवसभरात केवळ सात ग्रामपंचायत हद्दीत तब्बल ३७ रुग्ण आढळुन आले आहेत.

 याबाबत बोलतांना डॉ. डि. जे. जाधव म्हणाले, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी व उरुळी कांचन या प्रमुख चार ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमानात वाढु लागले आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमुख नागरीकांचा निस्काळजीपणा आहे. मोठ्या संख्येने रुग्ण वाढत असतानाही, नागरीक विना मास्क फिरत असल्याचे चित्र सर्वत्रच दिसुन येत आहे. तर भाजीपाला बाजार असो वा किराना दुकान, वरील सर्व ठिकाणी पाहिल्यास, सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडाला आहे. यामुळे पुर्व हवेलीत कोरोना वाढीचा वेग पुन्हा वाढला आहे. नागरीकांनी स्वतःची काळजी स्वतः घेण्याची गरज आहे.