पिंपरी चिंचवड़ मध्ये आज कोरोनामुळे ९५ जणांचा मृत्यू

आज शहरातील५९ आणि महापालिका हद्दीबाहेरील ३६ अशा ९५ जणांचा आज मृत्यू झाला. त्यात ६६ पुरुष आणि २९महिला रुग्णांचा समावेश आहे.

    पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील २१०२ आणि महापालिका हद्दीबाहेरील ११ अशा २११३ नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली आहे. तर, ९५ जणांचा मृत्यू झाला. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या२३६३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज शहरातील५९ आणि महापालिका हद्दीबाहेरील ३६ अशा ९५ जणांचा आज मृत्यू झाला. त्यात ६६ पुरुष आणि २९महिला रुग्णांचा समावेश आहे.

    शहरात आजपर्यंत २ लाख १७ हजार४९५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील १ लाख ९२ हजार ७८४ जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील ३०९२ जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या १५५७ अशा ४६४९ जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या ८०४७ सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर,२०७८ जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत ४ लाख ३ हजार४७४ जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.