पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा  ९१ हजारच्या पुढे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील २३५ नवीन रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या ९१ हजार ७५०वर पोहोचली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २२६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील चार रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. काळेवाडीतील ४७ वर्षीय पुरुष, वडमुखवाडीतील ६८ वर्षीय पुरुष, भोसरीतील ६२ वर्षीय पुरुष आणि महिला चिंचवडमधील ७५ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या ९३१ सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, १०८५ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

पिंपरी चिंचवड़ शहरात आजपर्यंत ९१ हजार ७५० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील ८७ हजार ८३० जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील १६८१ जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या ६६७ अशा २२८५ जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.