पिंपरी चिंचवड़मध्ये ही पेट्रोलची ‘सेंच्युरी’ पार ; वाहनचालकांचा संताप

देशात पेट्रोल डिझेलचे दर कमी व्हायलचे नाव घेत नाहीत. पुण्यात आज पेट्रोलने 'सेंच्युरी' पार केली तर, डिझेलचे दर नव्वदीपार गेले आहेत. पिंपरीत सोमवारी (दि.३१) पेट्रोल १००.३८, डिझेल ९०.९४ रुपये तर पॉवर पेट्रोल १०४.३६ असे दर नोंदवले गेले आहेत. पिंपरी - चिंचवडमध्ये पहिल्यांदाच पेट्रोलचे दर शंभरी पार गेले आहेत.

    पिंपरी: उद्योगनगरीत पहिल्यांदाच पेट्रोलच्या दराने शतकी आकडा पार केला आहे. त्यावर वाहनचालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. लॉकडाउनमुळे सर्वसामान्यांचे खिसे रिकामे झाले आहेत. नेमक्या त्याच मुहूर्तावर पेट्रोलने शतकी टप्पा कसा ओलांडला असा प्रश्न उपस्थित करीत पिंपरी – चिंचवडकरांनी पेट्रोल भडक्यासाठी केंद्र सरकारला दोषी ठरविले. एकीकडे उत्पन्न ठप्प आणि महागाईचा उच्चांक असा दुहेरी मारा सोसावा लागत असल्याची भावना व्यक्त केली.

    देशात पेट्रोल डिझेलचे दर कमी व्हायलचे नाव घेत नाहीत. पुण्यात आज पेट्रोलने ‘सेंच्युरी’ पार केली तर, डिझेलचे दर नव्वदीपार गेले आहेत. पिंपरीत सोमवारी (दि.३१) पेट्रोल १००.३८, डिझेल ९०.९४ रुपये तर पॉवर पेट्रोल १०४.३६ असे दर नोंदवले गेले आहेत. पिंपरी – चिंचवडमध्ये पहिल्यांदाच पेट्रोलचे दर शंभरी पार गेले आहेत. पेट्रोलचे दर नियंत्रणात राहतील असे स्वप्न दाखवित केंद्र सरकारने दरनिश्चितीचा चेंडू ऑइल कंपन्यांच्या कोर्टात टोलवला. पण, आता त्याचे उलट परिणाम दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी असताना दर कमी झाले नाहीत. त्यावेळी देशाच्या विकासाला हातभार लागत असल्याचे दर्शवित लूट केली गेली. आता कच्च्या तेलाचे दर वाढल्याने तेल कंपन्या दर वाढवायला मोकळा आहे. केंद्र सरकारला कर मिळतो, तेल कंपन्या मालामाल होतात, होरपळ केवळ सर्वसामान्यांनाच सहन करावी लागत आहे.

    कोरोनामुळे व्यवसाय पूर्णत: ठप्प आहे. सुमारे दीड वर्षापासून दमडीचेही उत्पन्न नाही. शासनाकडून कोणतीच मदत नाही. उसनवारीवर कुटुंब जगवणे सुरू आहे. महागाईने आधीच होरपळून काढले आहे. त्यात पेट्रोलने शंभरी गाठली आहे. पेट्रोल भरायचे की इंधन, हाच सर्वसामान्यांपुढील गहन प्रश्न आहे. ‘एक देश, समान कर’चा नारा देत देशात वस्तु व सेवा कर (जीएसटी) ची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. एकीकडे विरोध करूनही अनेक वस्तू जीएसटीच्या कक्षेत आणल्या गेल्या. त्याचवेळी वारंवार मागणी करूनही इंधन जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवले गेले आहे. सर्वसामान्यांना त्याचा फटका सोसावा लागत आहे. केंद्रांने मनात आणल्यास नागरिकांना मोठा दिलासा दिला जाऊ शकतो. पण, सर्वसामान्यांचे हितचिंतक असल्याचे दर्शविणारे केंद्र सरकार तसा निर्णय घेत नाही, ही शोकांतिकाच आहे.

    आजवर ऐकल्याप्रमाणे पेट्रोलचे दर कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील दरावर अवलंबून असते. पण, कोणत्याही निवडणुकांदरम्यान दरवाढ होत नाही. निवडणुका आटोपली की दरवाढ पाचवीलाच पुजलेली असते. निवडणूक आणि दरवाढीचा संबंध हे न उलगडणारे कोडे ठरले आहे. कोरोनामुळे कामधंदे ठप्प आहे. उत्पन्न थांबले आहे. त्याचवेळी महागाईचा भडका उडाला, त्यात आता पेट्रोल दरवाढीने भरच पडली आहे. तुटपुंज्या पगारात पेट्रोलचा खर्च आता न झेपणारा आहे. यामुळे अडगळीत पडलेली सायकल काढून वापरण्या शिवाय पर्याय नसल्याचे नागरिक सांगतात.