पुण्यात नवे ३३४ जण कोरोनाबाधित ; शहरातील सहा जणांसह १० जणांचा मृत्यू

गेल्या चाेवीस तासांत ३३४ नवीन रुग्ण आढळून आले तर २१२ जण काेराेनामुक्त झाले आहेत. सध्या शहरांत ३ हजार ३३ सक्रीय रुग्ण असुन, त्यापैकी २२५ जणांची प्रकृती गंभीर असुन, ५१३ जणांना अाॅक्सिजनचा पुरवठा केला जात अाहे. अाजपर्यंत एकुण ८ हजार ६७४ जणांचा बळी गेला आहे.

    पुणे : शहरातील संशयित काेराेना बाधितांच्या चाचण्यात वाढ केली गेली आहे. गेल्या चाेवीस तासांत ७ हजार ६९६ जणांची चाचणी केली गेली. यात ३३४ जण काेराेनाबाधित आढळून आले. तर शहरातील सहा जणांसह १० जणांचा मृत्यू झाला आहे.

    गेल्या काही दिवसांत महापािलकेने संशयित रुग्णांची चाचणी करण्याचे प्रमाण वाढविले आहे. गेल्या चाेवीस तासांत साडे सात हजाराहून अधिक जणांची चाचणी केली. आजपर्यंत शहरांत एकुण २७ लाख ६२ हजार ६७२ जणांची चाचणी केली गेली. यात ४ लाख ८२ हजार ९१६ जणांना काेराेनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. काेराेनाची लागण झालेल्यांपैकी ४ लाख ७१ हजार २०९ जणांनी काेराेनावर मात केली आहे.