शिवजयंतीला हाताता कोयता आणि बंदुक घेऊन तडीपार गुंडाचा भर रस्त्यात डान्स; व्हिडिओ व्हायरल

या व्हायरल व्हिडिओमध्ये रोशन लोखंडे हा हातात कोयता घेऊन एका तरुणाच्या खांद्यावर नाचताना दिसत आहे. तर, याच ग्रुपमध्ये नाचणाऱ्या अन्य एका तरुणाच्या हातात बंदूकही दिसत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ कुणीतरी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

    पुणे : शिवजयंतीच्या दिवशी हाताता कोयता आणि बंदुक घेऊन भर रस्त्यात तडीपार गुंडानी डान्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पुण्याच्या सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नऱ्हे येथील हा व्हिडिओ आहे.

    रोशन लोखंडे असे या व्हिडिओत दिसणाऱ्या तडीपार गुंडाचे नाव आहे. शिवजयंती दिवशी शहरात प्रवेश करत हातात कोयता घेऊन नाचत त्याने दहशत निर्माण केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    या व्हायरल व्हिडिओमध्ये रोशन लोखंडे हा हातात कोयता घेऊन एका तरुणाच्या खांद्यावर नाचताना दिसत आहे. तर, याच ग्रुपमध्ये नाचणाऱ्या अन्य एका तरुणाच्या हातात बंदूकही दिसत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ कुणीतरी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

    या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिंहगड रस्ता पोलिसांकडून मात्र अद्याप या प्रकरणी कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.

    यापूर्वी देखील गजा मारणे या गुंडाने तुरुंगातून सुटका झाल्यानंतर ३०० गाड्यांच्या ताफ्यासह जंगी मिरवणुक काढली होती. यानंतर गुंडगिरीची दहशत दाखवणारा आणखी व्हिडिओ समोर आल्याने पुण्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.