जिल्ह्यात १३ जणांनी केली कोरोनावर मात

अहमदनगर: जिल्ह्यातील १३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी सकाळी करोनातून बरे झालेल्या रूग्णांमध्ये संगमनेर ७ ,राहाता ३, नगर शहरातील २ आणि नगर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. शुक्रवारी

अहमदनगर: जिल्ह्यातील १३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी सकाळी करोनातून बरे झालेल्या रूग्णांमध्ये संगमनेर ७ ,राहाता ३, नगर शहरातील २ आणि नगर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. शुक्रवारी सकाळी वैद्यकीय तपासणी नंतर या १३ रूग्णांना बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. कोरोना आजारातून बरे होऊन हे १३ रूग्ण रुग्ण आज घरी परतले आहेत. नगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात चांगले असून कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता २३३ इतकी झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.