पुण्यात गेल्या २४ तासांत १ हजार ४४० नव्या पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद, तर २७ जणांचा मृत्यू

पुणे :  पुण्यात कोरोना विषाणूची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या २४ तासांत पुण्यात कोरोनाचे १ हजार ४४० नवे कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात २७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे पुणे शहरातं कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ४५६ वर पोहोचली आहे. तसेच दिवसभरात १ हजार १९६ रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले आहेत.   

सध्या पुणे शहरात १६ हजार ९७५ कोरोना रूग्ण हे  अ‍ॅक्टीव्ह आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी ६७४ रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी ४२५ रूग्णांना व्हेंटिलेटवरून उपचार देण्यात येत आहेत. तसेच पुणे शहरात कोरोना बाधितांची एकूण संख्या ही ६२ हजार ३७ वर जावून पोहोचली आहे. परंतु रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन युध्द पातळीवर काम करत आहेत.