In the next 25 years, the government of Mahavikas Aghadi will come - Supriya Sule

पुणे :  ‘ईडी’ची नोटीस आणि साताऱ्यातील पावसाचे रुपांतर सत्तेत झाले. ईडीचा पायगुण लय भारी. आता शिवसेनेला ईडीची नोटीस पाठविली आहे.  मग, शिवसेनेला(shivsena) आणखी काय मिळेल. महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले असून पाच नाही तर पंचवीस वर्ष महाविकास आघाडी पूर्ण करेल असा विश्वास राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(supriya sule) यांनी व्यक्त केला आहे.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीनिमित्त तळेगाव येथे आयोजित केलेल्या  कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या.

मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेऊन संपर्क साधावा. आपला उमेदवार प्रामाणिकपणे काम करणारा व स्वच्छ प्रतिमा असलेला आहे. त्यामुळे एक चांगले नेतृत्व देण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

याप्रसंगी माजी राज्यमंत्री मदन बाफना, आमदार सुनिल शेळके, आमदार संजय जगताप, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, शिवसेना तालुकाध्यक्ष राजू खांडभोर, एसआरपी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड तसेच महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.