तुझको मिरची लगी तो मै क्या करू… भाजप आमदाराचा ‘भन्नाट’ डान्स

आमदार लांडगे यांनी तरुणाईचा उत्साह वाढविण्यासाठी एका गाण्यावर चक्क डान्स केला. आमदार लांडगे यांच्या चाहत्यांनी त्यांना यावर टाळ्या, शिट्ट्यांनी चांगलीच दाद दिली. सायक्लोथॉनमध्ये आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या डान्सची शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे

पिंपरी:  इंद्रायणी नदी संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आयोजित केलेल्या ‘रिर्व्हर सायक्लोथॉन’ मध्ये रविवारी तब्बल ८ हजार ७९० सायकलपटूंनी सहभाग घेतला.  त्यावेळी आमदार महेश लांडगे ‘तुझको मिरची लगी तो मै क्या करू’ या गाण्यावर थिरकले. आमदार महेश लांडगे प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग घेत असतात. तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हणून त्यांची ओळख आहे.

 

इंद्रायणी नदी संवर्धन आणि पर्यावरण रक्षण तसेच तरुणाईला व्यायामाचे, सायकल चालविण्याचे महत्व पटावे यासाठी या सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले होते. त्यात आमदार लांडगे यांनी तरुणाईचा उत्साह वाढविण्यासाठी एका गाण्यावर चक्क डान्स केला. आमदार लांडगे यांच्या चाहत्यांनी त्यांना यावर टाळ्या, शिट्ट्यांनी चांगलीच दाद दिली. सायक्लोथॉनमध्ये आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या डान्सची शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे.