संकटकाळात ग्रामस्थच देत आहेत एकमेकांना मदतीचा हात

रावणगाव : देशात वाढत असलेल्या कोरोना आजाराच्या संसर्गामुळे तसेच संंचारबंदीमुळे लोकांना घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे.लॉकडाऊनमुळे शेती व्यवसायावर विपरीत परिणाम झाला असून अनेक शेतमजुरांसह वृद्ध ,

रावणगाव : देशात वाढत असलेल्या कोरोना आजाराच्या संसर्गामुळे तसेच संंचारबंदीमुळे लोकांना घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे.लॉकडाऊनमुळे शेती व्यवसायावर विपरीत परिणाम झाला असून अनेक शेतमजुरांसह वृद्ध , निराधार , अंग , विधवा अशा गोरगरीबांचे उपामारीने हाल होऊ लागल्याने रावणगाव – नंदादेवी ( ता.दौंड ) ग्रामस्थांनी एकत्र येत रावणगाव – नंदादेेवी रिलीफ आर्मी नावाचा व्हाट्सअँँप ग्रुप तयार करून त्याच्या माध्यमातून पैशांसह विविध वस्तू गोळा करून ११९ कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाप करण्यात आले .त्यामुळे गरजू व हातावर पोट असलेल्या कुटुंबांची उपासमार थांबण्यास मदत झाली आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने रावणगाव परिसातील गोरगरिबांची उपासमार होत असल्याचे निदर्शनास आल्याने रावणगाव येथील काही तरुणांनी एकत्र येत रावणगाव – नंदादेवी रिलीफ आर्मी नावाचा व्हाट्सअँप ग्रुप तयार केला.या ग्रुपमध्ये परिवहन अधिकारी , बँक अधिकारी , पोलीस अधिकारी , डॉक्टर , नर्स , शिक्षक , महसूल कर्मचारी , वकील , सामाजिक र्कार्यकर्ते , शासकीय कर्मचारी , राजकीय व्यक्ती अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना समाविष्ट करण्यात आले.आणि ज्याला शक्य आहे.अशा दानशूर व्यक्तींनी आपापल्या स्वेच्छेने पैशांच्या अथवा वस्तूंच्या स्वरूपात मदतीचे आवाहन करण्यात आले.

या आवाहनाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत एक लाख एकतीस हजार रुपये रोख रक्कम आणि साखर , गहू , तांदूळ , टोमॅटो , भुईमूग शेंगा ,भाजीपाला अशा विविध वस्तू जमा करण्यात आल्या.या सर्व वस्तूंसह जमा झालेल्या पैशातून ११९ वृद्ध , निराधार , अपंग , विधवा , ऊसतोड मजूर आणि इतर कामे करणाऱ्या कुटुंबांना भाजीपाल्यासह शेंगदाणे , तेल , साखर , तांदूळ , गहू , मीठ , साबण , बेसन , मसाला , कडधान्य अशा किराणा साहित्याच्या कीटचे रावणगाव परिसरसतील गावठाण , बंगलवस्ती , रानमळावस्ती , मेंढवाडगा , नंदादेवी , कोकणेवस्ती , नांगरेवस्ती , पिंपळाचामळा आदी परिसरातील खऱ्या गरजवंत कुटुंबांचा शोध घेऊन त्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन प्रत्येकाला दोन वेळा या कीटचे वाटप करण्यात आले.त्यामुळे येथील गोरगरिबांचा एक महिन्याचा का होईना तात्पुरत्या स्वरूपात खाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.