दोन दिवसात सुमारे सतरा हजार पुणेकरांनी केली ई टोकन घेऊन खरेदी

पुणे : दाेन दिवसांत सुमारे सतरा हजार पुणेकरांनी ई टाेकन घेऊन दारु खरेदी केली अाहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दुकानासमाेर हाेणारी गर्दी टाळण्यासाठी राबविलेली ई- टोकन प्रणाली पुण्यात यशस्वी हाेऊ लागली अाहे. दुकानासमाेरील गर्दीत घट झाल्याचे अाढळून अाले अाहे.

 पुणे : दाेन दिवसांत सुमारे सतरा हजार पुणेकरांनी ई टाेकन घेऊन दारु खरेदी केली अाहे.  राज्य उत्पादन शुल्क विभागाने दुकानासमाेर हाेणारी गर्दी टाळण्यासाठी राबविलेली ई- टोकन प्रणाली पुण्यात यशस्वी हाेऊ लागली अाहे. दुकानासमाेरील गर्दीत घट झाल्याचे अाढळून अाले अाहे.

राज्य सरकारने मद्यविक्री सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर दारुच्या दुकानासमाेर रांगा लागल्या हाेत्या. यात फिजीकट डिस्टन्स पाळला जात नसल्याने काेराेनाच्या प्रसाराचा धाेका निर्माण झाला हाेता. या दुकानसमाेर हाेणाऱ्या गर्दीतुन मार्ग काढण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ई टाेकन ही याेजना राबविण्यास सुरवात केली. मंगळवारी पहील्याच दिवशी सुमारे साडे दहा हजार पुणेकरांनी दारु खरेदीची वेळ निश्चित केली. तर बुधवारी दुपारपर्यंत सुमारे साडे सहा हजार जणांनी दुकानदाराची अपाॅइंटमेंट घेतली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या mahaexcise.com या संकेतस्थळावर ग्राहकाने नोंदणी केल्यानंतर ग्राहकाला ई-टोकन मिळेल. संबंधित संकेतस्थळावर नोंदणी करताना ग्राहकाला त्याचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, दारूचा कोणता प्रकार हवा आहे, आदींचा तपशील भरावा लागेल. त्याच्या पत्त्यातील पिनकोडनुसार ग्राहकाच्या घराजवळील मद्यविक्रीच्या दुकानांची यादी समाेर येईल. त्यातील दुकान निवडुन ग्राहकाने वेळ निवडुन दुकानात जायचे अाहे.
याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे म्हणाले, ‘‘ राज्यात  5 मेपासून मद्यविक्रीची दुकाने पुन्हा सुरू झाली असुन, दुकानसमाेर रांगा लागल्याने अाम्ही ई टाेकन पद्धत सुरू केली. ई टाेकन पद्धती प्रमाणे नियमितपद्धतीने सकाळी दहा ते सांयकाळी सहा यावेळेत दारु विक्री सुरू राहणार अाहे.  ई – टोकन मिळालेल्या ग्राहकाला रांगेत न थांबता मद्य मिळणार अाहे. ’’
पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये १७९ दुकानांत हा प्रयोग सुरू झाला आहे. पुण्यात यशस्वी झाला तर राज्यात त्याची अंमलबजावणी करण्याचा राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मानस आहे, अशी माहिती अधीक्षक झगडे यांनी दिली.कोरोनामुळे लॉक डाउनमुळे मद्यविक्रीची दुकाने बंद करण्यात आली होती. बार अजूनही बंद आहेत. परंतु, दुकाने उघडल्यावर झालेली गर्दी नियंत्रीत करणे दुकानदारांसाठी डोकेदुखी ठरली होती. त्यासाठी पोलिस बंदोबस्तही देण्यात आला. तर काही ठिकाणी शिक्षकांना गर्दी नियंत्रित करण्याची ड्यूटी देण्यात आली होती. त्यावर मिडीयामधून गदारोळ झाल्यावर शिक्षकांची ड्युटी रद्द करण्यात आली आहे.