उद्योगनगरीत चोरट्यांनी आठ दुचाकी लांबवल्या, दोन सायकलचीही

या प्रकरणी त्यांनी चिचंवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायकल चोरीचा हा प्रकार ७ ते १५ जुलै दरम्यान घडला. चोरट्याने नाईक यांच्या घराच्या पार्कींगमध्ये असलेली चार हजार रुपये व दोन हजार रुपये किंमत असलेल्या दोन सायकल चोरून नेल्या.

  पिंपरी: पिंपरी – चिचंवड पोलिसांना शहरातील वाहनचोरी रोखण्यात अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. उद्योगनगरीत चोरट्यांनी अगदी उच्छाद मांडला आहे. दिवसाढवळ्या वाहने गायब होत आहेत. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी आठ दुचाकी आणि दोन सायकलची चोरीच्या घटना घडल्या असून चोरट्यांनी पावणेदोन लाख रूपये किमतीची वाहने लांबवली आहेत. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

  वाहनचोरी प्रकरणी पिंपरी, देहूरोड, तळेगाव – दाभाडे, चाकण, भोसरी, निगडी या पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अमित एकनाथ चव्हाण (वय ३२, रा. चिंचवड) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चव्हाण यांनी त्यांची १० हजाराची दुचाकी थरमॅक्स चौकात पार्क केली असताना चोरट्याने दुचाकी चोरून नेली. अमोल मोहन हांडे (वय ३२, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भोसरी येथील रस्त्यावर दुचाकी पार्क करून ठेवली असता चोरट्याने त्यांची १५ हजार रूपये किमतीची दुचाकी चोरून नेली. चाकण पोलिस ठाण्यात योगेश राधाकिशन पगारे (वय ४०, रा. खालुंब्रे) यांनी फिर्याद दिली आहे. पगारे यांची ४० हजाराची दुचाकी घरासमोर पार्क केली होती. चोरट्याने ती चोरून नेली.

  विशाल दत्तात्रय दवणे (वय १९, रा. दवणेवस्ती) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दवणे यांची १० हजाराची दुचाकी घरासमोरून चोरट्याने चोरून नेली. शैलेश चिदानंद दोडमणी (वय ३५, रा. दळवीनगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी दोडमणी यांनी टाटा मोटर्स कंपनीच्या पार्कींगमध्ये ३० हजार रूपयांची दुचाकी पार्क केली होती. चोरट्याने तेथून दुचाकी चोरून नेली. सैफन मोफीजुल शेख (वय १८, रा. किवळे) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेख यांनी किवळे येथिल जयभवानी मटन अँड चिकन शॉप समोर १० हजार रूपये किमतीची दुचाकी पार्क केली असता चोरट्याने ती लांबवली. गणेश मधुकर रणधिर (वय २९, रा. गहुंजे) यांनी तळेगाव – दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  रणधिर यांनी आपल्या घरासमोर दुचाकी पार्क केली असता २० हजाराची दुचाकी घेऊन चोरटा पसार झाला. तसेच दुचाकीच्या सिटखाली असलेली दुचाकीची मुळ कागदपत्रेही चोरट्याने चोरून नेली. विनोद गंगाराम भोते (वय ३२, रा. परंदवडी ता. मावळ) यांनी शिरगाव चौकीत फिर्याद दिली आहे. भोते यांनी त्यांची १० हजार रूपये किमतीची दुचाकी घरासमोर पार्वâ केली होती. तीन चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरून दुचाकी चोरून नेली.

  चिंचवड येथून दोन सायकलची चोरी
  चिंचवड येथे बाजीराव सदाशिव नाईक (वय ४२, रा. प्रेमलोक पार्क चिंचवड) यांच्या घराच्या पार्कींगमधून दोन सायकलची चोरी झाली. या प्रकरणी त्यांनी चिचंवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायकल चोरीचा हा प्रकार ७ ते १५ जुलै दरम्यान घडला. चोरट्याने नाईक यांच्या घराच्या पार्कींगमध्ये असलेली चार हजार रुपये व दोन हजार रुपये किंमत असलेल्या दोन सायकल चोरून नेल्या.

  मोटारीच्या सायलेंसरची चोरी

  घरासमोर मोकळ्या जागेत पार्क केलेल्या इको व्हॅन मोटारीचा ३५ हजार रुपये किमतीचा सायलेंसर चोरून नेल्याचा प्रकार कडाचीवाडी येथे घडला. ईश्वर बाळासाहेब कोतवाल (वय ३२, रा. कडाचीवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कोतवाल यांनी त्यांची इको व्हॅन घरासमोर मोकळ्या जागेत पार्क केली होती. १७ ते १९ जुलै दरम्यान चोरट्यांनी मोटारीचा ३५ हजार रुपये किमतीचा सायलेंसर स्पेअर पार्ट चोरून नेला. चाकण पोलिस तपास करत आहेत.