वाघोलीत शिवसेनेतर्फे भगवे झेंडे दाखवून ठाकरे सरकारचे समर्थन

वाघोली : महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजप करत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाघोली येथे पुणे- नगर महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भगवे झेंडे दाखवून ठाकरे सरकारला शिवसेनेच्यावतीने

वाघोली : महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजप करत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाघोली येथे पुणे- नगर महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भगवे झेंडे दाखवून ठाकरे सरकारला शिवसेनेच्यावतीने समर्थन दर्शविण्यात आले.  

राज्यात कोरोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपच्या वतीने संपूर्ण राज्यभर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. भाजप करत असलेल्या निदर्शनाला विरोध दर्शवत वाघोली येथे शिवसेनेच्या वतीने पुणे-नगर महामार्गावरील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात भगवे झेंडे दाखवुन ठाकरे सरकारला पाठींबा दर्शवत समर्थन करण्यात आले.  

यावेळी शिवसेना पुणे सल्लागार राजेन्द्र भाऊ पायगुडे, वाहतुक सेना जिल्हा प्रमुख युवराज दळवी, युवासेना जिल्हाप्रमुख विशाल सातव, वाहतुक सेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र तांबे, वाघोली शहर प्रमुख दत्तात्रय बेंडावले आदी शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.