पूर्व हवेलीत अपुऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढतोय

लोणी काळभोर : साहेब पोलीस ठाणे आयुक्तालयाला जोडा किंवा ग्रामीण मध्ये ठेवा पण पोलीस कर्मचाऱ्यांवर येणारा ताण कमी करा अशी परिस्थिती पूर्व हवेलीतील गावामध्ये निर्माण झाली आहे. पुणे शहरालगत असलेले कदमवाक वस्ती ,लोणी काळभोर ,उरुळी कांचन,कुंजीरवाडी,सोरतापवाडी यागावाचा लोकसंख्येचा आलेख वाढत आहे.तीच परिस्थिती पुणे नगर रोड लगत असलेल्या वाघोली,लोणीकंद या गावाची झाली आहे. पुणे शहरालगत असल्याने यागावाचे शहरीकरण झपाट्याने होत चालले आहे . यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर याचा ताण येत आहे. प्रामुख्याने पोलीस यंत्रणेवर जास्त भार पडत असल्याचे दिसून येत आहे.

कदमवाक वस्ती,लोणी काळभोर,उरुळी कांचन यागावाची लोकसंख्या पाहता पोलीस कर्मचारी मनुष्य बळ कमी पडत आहे. तर ह्यापेक्षा वाघोली सारखे गाव महानगर पालिका असलेल्या शहरांना मागे टाकेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.लाखाच्या घरात गेलेली लोकसंख्या अन मूठभर पोलीस मनुष्यबळ यामुळे निर्माण होणाऱ्या समस्याचा ताण स्थानिक पोलीस वर्गावर पडत आहे.मात्र  ह्याचे ना लोकप्रतिनिधी, ना नेत्यांना सौरशुतक नसल्याचे दिसून येत आहे.  शहरालगतच्या पोलीस ठाणातील पोलीस कर्मचारी वर्गाच्या परिस्थितीचा समस्यांचा  विचार करता ही लोणी काळभोर व लोणी कंद पोलीस स्टेशन पोलीस आयुक्त कार्यालयाला जोडले तर पोलीसांचा भरसा ताण कमी होईल अशी माफक अपेक्षा जनतेकडून केली जात आहे.

एकेकडे वाघोली गाव महानगर पालिकेत समाविष्ट करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.तर काही लोकप्रतिनिधी हडपसर महानगर पालिका करण्याच्या तयारीला लागले आहेत.असे असताना पुणे शहरालगत असलेली गावे पोलीस आयुक्तालयाला जोडले तर नक्कीच ग्रामीण पोलिसांवर येणार ताण कमी होईल.