भोर नगरपरिषदेच्या इमारतीचे उदघाटन

भोर  : नगरपरिषदेची वास्तू शहराच्या वैभवात भर घालणारी असून शहरातील कॉक्रींटचे रस्ते इतरांसाठी आदर्श ठरत आहेत. भविष्यात शहराच्या उर्वरित कामांची पूर्तता केली जाईल. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटीबध्द आहोत, असा विश्वास आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केला. येथील नगपरिषदेच्या पांच कोटी रूपये खर्चाच्या तीन मजली सुसज्ज इमारतीचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा निर्मला आवारे, उपाध्यक्ष अनिल पवार, तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, मुख्याधिकारी डॉ.विजय थोरात, गटनेते सचिन हर्णसकर,नगरसेवक आदी उपस्थित होते. त्यामध्ये पांच हजार चौरस फूटाचे वाहनतळ, बावीस व्यापारी गाळे, दोन हजार चौरस फूटाचा व्यावसायिक हॉल, मुख्याधिकारी व नगराध्यक्षांचे पांचशे चौरस फूटाचे आँफीस. उपाध्यक्ष, नगरसेवकांसाठी स्वतंत्र केबिन तर कर्मचाऱ्यांंसाठी आधुनिक सुविधांसह तेरा खोल्यां, स्वतंत्र अभिलेख कक्षाचा समावेश आहे.