म्हसे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयाचे  उदघाटन

कवठे येमाई :  भारताच्या ७४ व्या स्वातंत्रदिनाचे औचत्य साधत शिरूर तालुक्यातील म्हसे बुद्रुक या टाकळीहाजी गावातून विभक्त ग्रामपंचायत झालेल्या कार्यालयाचे उदघाटन काल दि. १५ ऑगस्टला संपन्न झाले. शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे  यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. तर  ध्वजारोहन सोहळा महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तथा घोडगंगा सह सा कारखाना संचालक राजेंद्र गावडे यांच्या हस्ते संपन्न झाला.तर येथील बापुसाहेब गावडे विदयालयाचा झेंडा वंदन सोहळा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोनभाऊ मुसळे यांच्या हस्ते संपन्न झाला. जिल्हा परीषद प्राथमिक  शाळा झेंडा वंदन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश वायसे यांच्या हस्ते पार पडले. म्हसे बुद्रुक हे गाव टाकळी हाजी ग्रामपंचायतीतून विभक्त ग्रामपंचायत करण्यासाठी म्हसे बुद्रुक  गावातील तरुणांच मोठ योगदान असल्याचे माजी आमदार गावडे यांनी  सांगितले.       

या कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामपंचायत प्रशासक गायकवाड , ग्रामसेवक खराडे , प्राचार्य आर बी गावडे , उपसरपंच तुकाराम ऊचाळे माजी उपसरपंच कोंडीभाऊ खाडे , चेअरमन सोनभाऊ मुसळे , अध्यक्ष प्रकाश वायसे ,चेअरमन डॉ बापु मुसळे, शिवाजीराव चाटे , ग्रा पं स पांडुरंग खाडे , जयवंत मुसळे , दत्तात्रय मुसळे , संदिप मुसळे , रोहिदास मुसळे , गुलाब  पवार, हनुमंत मुसळे,संजय खाडे,चंद्रकांत गावडे , संतोष खाडे , राजेंद्र गोसावी, कैलास पवार, कुमार पवार व म्हसे गावातील सर्व जेष्ठ मंडळी व महिला व तरूण  मोठया संखेने उपस्थीत होते.