शिरूर तालुक्यातील  शरदवाडी ग्रामपंचायत कार्यालयाचे उदघाटन

कवठे येमाई :  भारताच्या ७४ व्या स्वातंत्रदिनाचे औचत्य साधत शिरूर तालुक्यातील शरदवाडी या जांबुत गावातून विभक्त ग्रामपंचायत झालेल्या ग्रामपंचायत कार्यालयाचे उदघाटन  दि. १५ ऑगस्टला संपन्न झाले.जि प सदस्या श्रीमती सुनिताताई गावडे,राज्य ई फेरफारप्रकल्पाचे राज्य समन्वयक तथा पुण्याचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप, सेवानिवृत्त सीईओ प्रभाकर गावडे, पंचायत समिती सदस्य डॉ सुभाष पोकळे, माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव आण्णा जोरी,जांबूतच्या सरपंच डॉ. जयश्री जगताप, प्रशासक डी के गायकवाड,ग्रामपंचायत सदस्य सुभाष सरोदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. 

शरदवाडीला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळावा म्हणून सरकार दरबारी विशेष प्रयत्न केलेले जांबूतचे उपसरपंच गणेश सरोदे यांनी ग्रामस्थांना सोबत केलेल्या पाठपुराव्यामुळे शरदवाडी ही स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून अस्तित्वात आली असल्याची भावना स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली. यावेळी ग्रामसेवक वि.के. खंबायत यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शरदवाडी  झेंडा वंदन सोहळा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविंद्र गावडे यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातील सर्व जेष्ठ मंडळी व महिला व तरूण मोठया संखेने उपस्थीत होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक गांजे यांनी केले.