प्लाझ्मा दानसाठी प्रोत्साहन : प्लाझ्मा दान करा अन् हजार रुपये मिळवा!

कोरोनाचे संकट गडद झाले असताना कोरोनाबाधित रुग्णांना प्लाझ्माची अत्यंत गरज भासते. प्लाझ्मा मिळविण्यासाठी नातेवाईकांची एकच धावपळ सुरू होते. सोशल मीडियावरून दररोज हजारो पोस्ट प्लाझ्मा मिळविण्यासाठी फिरत असतात. कुणाला मिळतो तर कुणाच्या पदरी निराशेशिवाय काही पडत नाही. काहींना फुकट मिळते तर काहींना पैसे मोजूनही प्लाझ्मा मिळत नसल्याची भयानक परिस्थिती आहे.

    पिंपरी : कोरोनावर पूर्णपणे यशस्वी मात करून बरे झालेल्या सर्व नागरिकांनी तसेच वैद्यकीय आणि प्रशासकीय सेवेतील सर्वच योद्ध्यांनी आपला प्लाइमा दान करावा. जे व्यक्ती प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घेतील त्यांच्यासाठी प्रोत्साहन म्हणून एक हजार रुपये स्वखर्चातून देण्यात येईल, अशी घोषणा शिवसेना विभागप्रमुख संतोष तानाजी वाळके यांनी प्लाझ्मा दान अभियानाद्वारे केली आहे.

    कोरोनाचे संकट गडद झाले असताना कोरोनाबाधित रुग्णांना प्लाझ्माची अत्यंत गरज भासते. प्लाझ्मा मिळविण्यासाठी नातेवाईकांची एकच धावपळ सुरू होते. सोशल मीडियावरून दररोज हजारो पोस्ट प्लाझ्मा मिळविण्यासाठी फिरत असतात. कुणाला मिळतो तर कुणाच्या पदरी निराशेशिवाय काही पडत नाही. काहींना फुकट मिळते तर काहींना पैसे मोजूनही प्लाझ्मा मिळत नसल्याची भयानक परिस्थिती आहे. प्लाझ्मा दान करण्याबाबत नागरिकांमध्ये असलेली अनास्था प्रकर्षाने दिसून येत आहे.प्लाझ्मा दान करण्यासाठी नागरिकांनी पुढे येऊन अनेकांचे जीव वाचविण्यासाठी एक मदतीचा हात म्हणून दिघीतील संतोष तानाजी वाळके यांनी अभियान सुरू केले आहे. प्लाझ्मा दात्यांनी नोंदणी करून प्लाझ्मा दान करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.