शहरात वेगवेगळ्या परिसरात चोरी व घरफोडीच्या घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी दहा ते दुपारी अडीच वाजताच्या कालावधीत चोरट्यांनी मुरलीधर काळभोर यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून भारत गॅस कंपनीच्या दोन सिलिंंडर टाक्या चोरून नेल्या.

    पिंपरी: खंडोबामाळ भोसरी येथे चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून सिलिंडरच्या दोन टाक्या चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुरलीधर सीताराम काळभोर (वय ५७, रा. गजानन हाऊसिंग सोसायटी, खंडोबामाळ, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी दहा ते दुपारी अडीच वाजताच्या कालावधीत चोरट्यांनी मुरलीधर काळभोर यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून भारत गॅस कंपनीच्या दोन सिलिंंडर टाक्या चोरून नेल्या. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

    दुसरीकडे निगडी व पिंपरी परिसरातून तीन दुचाकींची चोरी झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मयूर रत्नाकर चौधरी (वय ३३, रा. श्रीविनायक यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी चौधरी यांची ३५ हजार रूपये किंमतीची दुचाकी गुरुवारी दुपारी दोन ते रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास राहत्या घरासमोरून चोरीस गेली. किरण दत्तू पाटील (वय ४५, रा. स्वानंद अपार्टमेंट, विवेकनगर, आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी पाटील यांची एम एच १४ / ई ए ७५१८ ही काळ्या रंगाची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली.

    निगडी पोलीस तपास करीत आहेत. पीराराम पायलुराम विशनोई (वय ३५, रा. जय बाबा मार्केट, मेन बाजार, पिंपरी) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी विशनोई यांनी आपली ३० हजार रुपये किमतीची (एम एच १४ / जी एल ७३९३) ही दुचाकी नऊ जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास पार्क केली होती दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजताच्या सुमारास दुचाकी चोरीस गेल्याचे दिसून आले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.