लॉकडाउनमध्ये पाठदुखीच्या तक्रारींमध्ये वाढ

पुणे : लॉकडाउनमध्ये हालचालींच्या अभावामुळे मान आणि पाठदुखीच्या तक्रारींमध्ये वाढ दिसून येत आहे. या काळात अचानक जीवनशैलीमध्ये बदल, हालचालींचा अभाव आणि घरीच बसल्यामुळे तसेच विविध सुविधांची उपलब्धता

पुणे : लॉकडाउनमध्ये हालचालींच्या अभावामुळे मान आणि पाठदुखीच्या तक्रारींमध्ये वाढ दिसून येत आहे. या काळात अचानक जीवनशैलीमध्ये बदल, हालचालींचा अभाव आणि घरीच बसल्यामुळे तसेच विविध सुविधांची उपलब्धता नसल्यामुळे या तक्रारी वाढलेल्या दिसून येत आहेत.

संचेती हॉस्पिटल मधील स्पाईन युनिट चे प्रमुख डॉ शैलेश हदगावकर म्हणाले की, लोकं घरून काम करत आहेत आणि एकाच जागी चुकीच्या अवस्थेत तासनतास बसून ब्रेक न घेता बसत आहेत. त्याचबरोबर बाहेर व्यायाम करणे किंवा चालणे देखील या काळात शक्य नाही. हालचालींच्या अभावामुळे तरुण वर्गात देखील मान आणि पाठदुखी च्या नव्या समस्या दिसून येत आहे. यामुळे  जुन्या आणि नवीन तक्रारी समोर येत असून यामध्ये कोरडे डोळे,बद्धकोष्टता सारखे पचनाचे विकार, मान आणि पाठदुखी, मधुमेहाची तीव्रता वाढणे,नैराश्य, चिंता अशा मानसिक आणि शारीरिक समस्या काही प्रमाणात वाढल्या आहेत.  

 संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. पराग संचेती यांच्या मते लोकांच्या आरोग्याच्या समस्यांबाबत आपल्याला स्पष्टता असणे गरजेचे आहे, मात्र लॉकडाउनच्या काळात ऑर्थोपेडिक उपचारांमध्ये फ्रॅक्चरसारख्या तातडीची परिस्थिती सॊडून इतर आरोग्यसेवांबाबत मर्यादा आहे. अनेक लोकं इतर समस्या अंगावर काढत आहेत.