राखीपौर्णिमेमुळे एसटीच्या फेऱ्यांत वाढ ; प्रवासीही वाढले

पुणे विभागाने शुक्रवार पासून अतिरिक्त गाडया सोडण्याचे नियोजन आहे. यात पुणे . नागपूर, पुणेसोलापूर, पुणे -कोल्हापूर, पुणेसातारा, आदी प्रमुख मार्गासह पुणे ग्रामीण भागात जास्त गाडया सोडण्यात येतील.यात पुणे-दौंड, पुणेइंदापर, आदी भागांचा समावेश आहे.

    पुणे: राखीपौर्णिमेचे औचित्य साधून राज्यात एसटीने प्रवास करणाऱ्याच्या संख्येत वाढ होत आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाने बस फेऱ्याच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला. यामुळे प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. पुणे विभागाने आपल्या १३ आगारप्रमुखांना तशा सूचना देऊन अतिरिक्त बसचे नियोजन करण्यास सांगितले.

    पुणे विभागाने शुक्रवार पासून अतिरिक्त गाडया सोडण्याचे नियोजन आहे. यात पुणे . नागपूर, पुणेसोलापूर, पुणे -कोल्हापूर, पुणेसातारा, आदी प्रमुख मार्गासह पुणे ग्रामीण भागात जास्त गाडया सोडण्यात येतील.यात पुणे-दौंड, पुणेइंदापर, आदी भागांचा समावेश आहे.

    या मार्गावर वाढणार फेऱ्या : पुणे – सातारा, पुणे – कोल्हापूर, पुणे -ठाणे, पुणे – बोरिवली, पुणेसोलापूर, पुणे- पंढरपूर,पुणे – दोंड, पुणे – बारामती, पुणे – इंदापूर आदी मार्गावर फेयाची संख्या वाढणार आहे. टायमिंग गाड्यासह बसेसच्या ३० टक्के अतिरिक्त फेऱ्या होणार आहे.

    प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन : राखीपौर्णिमे निमित्ताने एसटी गाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त गाड्याचे नियोजन केले आहे.जवळपास ३० ते ३५ टक्के प्रवासी संख्या वाढेल असा एसटी प्रशासनाचा अंदाज आहे.
    सध्या सुरु असलेल्या बस: पुणे-सातारा, पुणे- कोल्हापूर, पुणे -ठाणे, पुणे – बोरिवली, पुणेसोलापूर, पुणे – पंढरपूर, पुणे – फलटण, पुणे-औरंगाबाद, पुणेबीड, पुणे-नाशिक, पुणेअहमदनगर,आदी मार्गावर पूर्ण क्षमतेने बस गाडया धावत आहेत.

    राखी पौर्णिमेला होणारी गर्दी लक्षात घेता बस फेयाची संख्या वाढविणार आहोत. तसेच प्रवाशांचा प्रतिसाद पाहून अन्य मार्गावर देखील अतिरिक्त बस सोडले जातील.

    - पल्लवी पाटील, स्वारगेट बस स्थानक प्रमुख, पुणे