शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाढ ; शिक्षण विभागाची आकडेवारी

४ ऑक्टोबरला ग्रामीण भागातील ८८.९१ टक्के , शहरी भागातील ८०.३५ टक्के सुरू झाल्या होत्या. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची ५२.६७ टक्के आणि शहरी भागात ३५.५० टक्के उपस्थिती होती. त्यानंतर शाळा सुरू होण्याच्या प्रमाणात, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाढ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिक्षण विभागाच्या ८ ऑक्टोबरच्या आकडेवारीनुसार, मुंबई विभागातील ग्रामीण भागात ८८.९६ टक्के आणि शहरी भागातील ८२.३४ टक्के शाळा सुरू झाल्या आहेत. विभागातील विद्यार्थ्यांची उपस्थिती ग्रामीण भागात ६४.६० टक्के , शहरी भागात ३५.९९ टक्के आहे.

    पुणे : राज्यात शाळा सुरू झाल्यानंतर शाळा सुरू होण्याच्या प्रमाणात आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील ९४ टक्के , तर शहरी भागातील ८४.६८ टक्के शाळा सुरू झाल्या असून, विद्यार्थ्यांची उपस्थिती ग्रामीण भागात ५८.७७ टक्के आणि शहरी भागात ४६.०८ टक्के असल्याचे शिक्षण विभागाने संकलित के लेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

    ४ ऑक्टोबरला ग्रामीण भागातील ८८.९१ टक्के , शहरी भागातील ८०.३५ टक्के सुरू झाल्या होत्या. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची ५२.६७ टक्के आणि शहरी भागात ३५.५० टक्के उपस्थिती होती. त्यानंतर शाळा सुरू होण्याच्या प्रमाणात, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाढ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिक्षण विभागाच्या ८ ऑक्टोबरच्या आकडेवारीनुसार, मुंबई विभागातील ग्रामीण भागात ८८.९६ टक्के आणि शहरी भागातील ८२.३४ टक्के शाळा सुरू झाल्या आहेत. विभागातील विद्यार्थ्यांची उपस्थिती ग्रामीण भागात ६४.६० टक्के , शहरी भागात ३५.९९ टक्के आहे.पुणे विभागाच्या ग्रामीण भागातील ९५.३३ टक्के आणि शहरी भागातील ६८.६८ टक्के शाळा सुरू झाल्या, तर विद्यार्थ्यांची उपस्थिती ग्रामीण भागात ४३.४७ टक्के , शहरी भागात ३७.५२ टक्के आहे. नाशिक विभागाच्या ग्रामीण भागातील ९४.५३ टक्के आणि शहरी भागातील ९४.९० टक्के शाळा सुरू झाल्या, तर विभागातील विद्यार्थ्यांची उपस्थिती ग्रामीण भागात ६६.५५ टक्के , शहरी भागात ४७.७५ टक्के आहे.