आंबेगाव तालुक्यात ११२ नवीन कोरोना रुग्णांची वाढ

चार रुग्णांचा एकाच दिवसात मृत्यू
मंचर : आंबेगाव तालुक्यात ११२ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असुन चार रुग्णांचा मृत्यु झाला आहे. एकुण रुग्णसंख्या २ हजार ९३५ झाली आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी जािलंदर पठारे यांनी शुक्रवारी दिली.
पारगांव येथे ३२,अवसरी खुर्द येथे १५,घोडेगांव ,साकोरे येथे प्रत्येकी १०, काळेवाडी/ दरेकरवाडी येथे ६,निरगुडसर येथे ७, मंचर येथे ५, पहाडदरा,पिंपळगांव,तांबडेमळा,शिगवे, जवळे येथे प्रत्येकी ३,टाकेवाडी,लोणी येथे प्रत्येकी २, मेंगडेवाडी,अवसरी बुद्रुक,शिनोली,महाळुंगे पडवळ, चिंचोडी, चास,रांजणी, एकलहरे,भराडी,नारोडी,चांडोली खुर्द, आमोंडी,कळंब येथे प्रत्येकी एक रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहे. एकुण रुग्णसंख्या २ हजार ९३० झाली असुन आतापर्यंत ८५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. १ हजार ९४३ रुग्ण बरे झाले असुन ९०२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सभापती संजय गवारी यांनी दिली. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. नागरिकांनी महत्वाच्या कामाव्यतिरिक्त बाहेर पडु नये. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असलेल्या नियमांचे पालन करावे. अन्यथा पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल.असा इशारा मंचर पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक कृष्णदेव खराडे, घोडेगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रदिप पवार यांनी दिला आहे.