जुन्नर तालुक्यात एकाच दिवशी ९ कोरोना रुग्णांची वाढ

आळेफाटा: जुन्नर तालुक्यात एकाच दिवशी कोरोना पाॅझिटिव्हचे ९ रुग्ण आढळून आल्यामूळे तालुक्यातील रुग्णांची संख्या अडूसष्टवर गेली आहे.

 आळेफाटा:  जुन्नर तालुक्यात एकाच दिवशी कोरोना पाॅझिटिव्हचे ९ रुग्ण आढळून आल्यामूळे तालुक्यातील रुग्णांची संख्या अडूसष्टवर गेली आहे त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. दिवसेंदिवस जुन्नर तालुक्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. एकाच दिवसात नऊ पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. नेतवड मध्ये एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. उंब्रजमध्ये चार व पिंपळवंडीमध्ये तिन तर पिंपळगाव मधील वाणीमळा या ठिकाणी एक असे एकूण ९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. तालुक्यातील रुग्णांची संख्या आता अडूसष्टवर गेली आहे. दरम्यान मंगळवारी (दि.३०) जुन्नरचे तहसीलदार हनुमंत कोळेकर प्रांत अधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी पिंपळवंडी या ठिकाणी भेट देऊन पहाणी केली. प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरदराव लेंडे पिंपळवंडी ग्रामपंचायत सरपंच सोमनाथ माळी उपसरपंच प्रदीप चाळक ग्रामविकास अधिकारी जी एस जाधव उपस्थित होते.