सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राचे प्रमाण वाढले; नियम मोडणाऱ्यावर होतेय दंडात्मक कारवाई

पुणे महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयांतर्गत इमारत, सोसायटी आणि छोटा परिसर असे सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहेत. चार किंवा पाच इमारती असणाऱ्या एखाद्या हाऊसिंग सोसायटी आणि छोट्या परिसरात २० पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास ती सोसायटी आणि छोटा परिसर सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला जात आहे.

    पुणे: राज्यात आणिक प्राधान्याने पुण्यात वेगाने वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. अनेक रुग्णांमध्ये अत्यंत सूक्ष्म लक्षणे आढळत असल्याने त्यांचे गृहविलगीकरणकरण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे शहरात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र वाढले असून त्याची संख्या २०६होऊन अधिक झाली आहे. त्यामध्ये ७८ इमारती आणि ९५ हाऊसिंग सोसायटी ३३ छोटे परिसर यांचा समावेश आहे.

    पुणे महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयांतर्गत इमारत, सोसायटी आणि छोटा परिसर असे सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहेत. चार किंवा पाच इमारती असणाऱ्या एखाद्या हाऊसिंग सोसायटी आणि छोट्या परिसरात २० पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास ती सोसायटी आणि छोटा परिसर सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला जात आहे.
    एखाद्या इमारतीमध्ये ५ पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास ती इमारत सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली जात आहे. इमारती किंवा सोसायटीमध्ये असणाऱ्या रुग्णांच्या हातावर स्टॅम्प मारला जातो. तसेच दोन्हीच्या प्रवेशद्वारावर रुग्णांचे नावही लिहिले जात आहे. रुग्णांना या सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रातून आत – बाहेर करण्यास सक्त मनाई आहे. तसे केल्यास महापालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे.

    दररोज रुग्णांच्या संख्येत चढ – उतार होत आहे. त्यामुळे या सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राच्या संख्येतही बदल होणार आहेत. शहरातील सर्व क्षेत्र हे क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सोपवण्यात आले आहेत. त्यानुसार आकडेवारीतही बदल होणार आहेत. पुणे शहरात सद्यस्थितीत २९ हजार ९८३ हून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. काल दिवसभरात ३ हजार ५९४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.