प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

एक आरोपी सतिश भानुदास सुर्यवंशी हा सराईत गुन्हेगार आहे.त्याचेवर यापुर्वी इंदापूर,पिंपरी चिंचवड येथे दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत.आरोपींकडून आणखी हत्यारे व इतर चोरीचे गुन्हे उघडकीस येतात काय याचा तपास करावयाचा आहे.आरोपीच्या ज्या साथीदारांनी हत्यारे बनवून घेतली आहेत,त्यांची गोपनीय माहिती मिळाली आहे.

    इंदापूर :  घातक हत्यारे बाळगल्याच्या आरोपावरुन इंदापूर पोलीसांनी दोघांजणांना अटक केली आहे.इंदापूर न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.सतीश भानुदास सूर्यवंशी (वय ३१ वर्षे,रा.कळाशी ता.इंदापूर), विष्णू पोपट भोसले(वय २१वर्षे, रा.लोंढेवस्ती,गागरगाव,ता.इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. शनिवारी (दि.२०) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास,तालुक्यातील भावडी गावच्या हद्दीत त्यांच्यावर कारवाई झाली.

    पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांना या दोघांकडे घातक हत्यारे असल्याची माहिती मिळाली होती.त्यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दीपक पालके,महिला पोलीस हवालदार माधुरी लडकत, पोलीस कर्मचारी विनोद दासा मोरे व अर्जुन भालसिंग यांच्या पथकाने भावडी गावात छापा टाकला.त्यांना तेथे एका महिंद्रा कंपनीचे पिकअप जीप (क्र.एम.एच १२ एस एफ ९५७९) मध्ये एक लोखंडी धारदार पाते असलेली तलवार व लोखंडी धारदार पाते असलेला कोयता अशी घातक हत्यारे बाळगल्याच्या स्थितीत मिळून आली.आरोपींना अटक करुन इंदापूर न्यायालयात हजर करण्यात आले.त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

    यातील एक आरोपी सतिश भानुदास सुर्यवंशी हा सराईत गुन्हेगार आहे.त्याचेवर यापुर्वी इंदापूर,पिंपरी चिंचवड येथे दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत.आरोपींकडून आणखी हत्यारे व इतर चोरीचे गुन्हे उघडकीस येतात काय याचा तपास करावयाचा आहे.आरोपीच्या ज्या साथीदारांनी हत्यारे बनवून घेतली आहेत,त्यांची गोपनीय माहिती मिळाली आहे.ते निष्पन्न करुन, हत्यारे तयार करणारांना अटक करायचे आहे,असे पोलीस सूत्रांनी सांगितले.हवालदार दीपक पालके अधिक तपास करत आहेत.