कठोर निर्बंधांच्या नावाखाली…. चंद्रकांत पाटील यांचा खळबळजनक दावा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी विकेंड लॉकडाऊनबाबत चर्चा केली गेली मात्र पत्रक पूर्ण लॉकडाऊनचे काढले गेले. फडणवीसांना खोटी माहिती देण्यात आली. भाजपा आणि सर्वसामान्य जनता हे सहन करणार नाही असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

    पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर निर्बंधांच्या नावाखाली अप्रत्यक्ष लॉकडाऊन करून एक प्रकारे महाराष्ट्राची फसवणूक केली असल्याचा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात पाटील यांनी लॉकडाऊनवरून ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे. लॉकडाऊनवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फसवणूक केल्याची टीका त्यांनी केली.

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी विकेंड लॉकडाऊनबाबत चर्चा केली गेली मात्र पत्रक पूर्ण लॉकडाऊनचे काढले गेले. फडणवीसांना खोटी माहिती देण्यात आली. भाजपा आणि सर्वसामान्य जनता हे सहन करणार नाही असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

    यावेळी राज्यातील कोरोना परिस्थितीविषयीही त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, कोविडच्या सावटामध्ये जनतेबरोबर राहण्याचा आणि त्यांना दु:खातून बाहेर काढण्याचा आमचा निश्चय आहे. ऑक्सिजन, बेड देखील वाढण्याचा निश्चय असल्याचे ते म्हणाले.