क्षयरुग्णांची माहिती द्या अन फौजदारी कारवाई टाळा  पिंपरीचिंचवड महापालिके आवाहन

शहरातील सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिक, पॅथोलॉजिलॅब, रेडिओलॉजिस्ट आणि औषध विक्रेत्यांना  महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे यांनी केले आहे.देशाला २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त करायचे आहे. त्यामुळे केंद्र सरकारने क्षयरोगास गंभीर धोकादायक आजारांच्या यादीत घेतले आहे. त्यानुसार क्षयरुग्णांची नोंद करुन त्याची माहिती विहित नमुन्यात सरकारकडे पाठवणे बंधनकारक आहे.

    पिंपरी: शहरातील क्षयरुग्णांची माहिती द्या आणि फौजदारी कारवाई टाळा, असे आवाहन शहरातील सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिक, पॅथोलॉजिलॅब, रेडिओलॉजिस्ट आणि औषध विक्रेत्यांना  महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे यांनी केले आहे.देशाला २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त करायचे आहे. त्यामुळे केंद्र सरकारने क्षयरोगास गंभीर धोकादायक आजारांच्या यादीत घेतले आहे. त्यानुसार क्षयरुग्णांची नोंद करुन त्याची माहिती विहित नमुन्यात सरकारकडे पाठवणे बंधनकारक आहे.अशा रुग्णांची माहिती शहरातील खासगी डॉक्टर (वैद्यकीय व्यवसायिक), पॅथोलॉजीलॅब, रेडिओलॉजिस्ट आणि औषध विक्रेत्यांना असते. त्यांनी त्यांच्याकडे निदान झालेल्या सर्व क्षयरुग्णांची माहिती शहर क्षयरोग अधिकारी यांना आणि जीत संस्थेला ई-मेलद्वारे दर महिन्याच्या २५ तारखपर्यंत कळवावी. माहिती लपविणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. त्यामुळे कारावास किंवा दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, अशी माहिती डॉ. पवन साळवे यांनी दिली.