कवठे येमाई : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे मुंबईवरून आलेल्या ४ जणांपैकी ३ जणांचे वैद्यकीय अवहाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन खडबडून जहाज झाले असून आज पासून पुढील १४ दिवस कवठे

कवठे येमाई :  शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे  मुंबईवरून आलेल्या ४ जणांपैकी ३ जणांचे वैद्यकीय अवहाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन खडबडून जहाज झाले असून आज पासून पुढील १४ दिवस कवठे येमाई गाव कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी हे ४ जण वास्तव्यास होते त्या सभागृहापासूनचा काही परिसर पूर्णपणे बंद करण्यात येत असल्याची माहिती सरपंच अरुण मुंजाळ,तलाठी सर्फराज देशमुख, ग्रामविकास अधिकारी संतोष गायकवाड यांनी दिली. 

 कवठे येमाईत प्रथमच ३ जण कोरोनाग्रस्त आढळल्याने शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांनी आज तात्काळ कवठे येमाईत भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन तहसीलदार शेख यांनी केले. 

    गाव परिसरात बाहेरून येणा-या व्यक्तींची तात्काळ प्रशासनास माहिती द्या. आरोग्य विषयक तक्रारी असल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासून औषोधोपचार घ्या.महत्वाचे  म्हणजे  स्वतःची व कुटुंबाची सुरक्षितता धोक्यात येऊ नये म्हणून म्हणू योग्य ती खबरदारी  घेण्याचे आवाहन ही शेख यांनी उपस्थित अधिकारी,पदाधिकारी व ग्रामस्थांना केले. 

  १४ दिवस कवठे येमाई गाव कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले असल्याने अत्यावश्यक सेवा,दूध,किराणा,मेडिकल यांनी योग्य ती खबरदारी घेऊन कोरोरणा विषाणूच्या पार्श्वभूमीवर आपले व ग्राहकांचे संरक्षण करण्याचे आवाहन ही शेख यांनी केले. 

  यावेळी शिरूर पंचायत समितीचे सदस्य,डॉ.सुभाष पोकळे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ,शिंदे,डॉ,आव्हाड,डॉ.पानगे,डॉ.कट्टीमनी, सरपंच अरुण मुंजाळ,माजी सरपंच कानिफनाथ हिलाळ, दीपक रत्नपारखी,छोटूभाई शाह,डॉ. शितोळे, तलाठी देशमुख,ग्रामसेवक गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.