corona

पुणे : कोरोना बाधितांवर वेळेवर उपचार करणे अािण ताे नियंत्रित करण्यासाठी सर्दी, फ्लू अादी  लक्षणे अाढळून येणाऱ्या  रुग्णांची माहिती महापालिकेच्या क्षेत्रीय वैद्यकीय अधिकार्‍यांना द्या, असे आदेश महापालिकेने शहरातील सर्व खाजगी दवाखाने, क्लिनिक व डिस्पेन्सरी यांना दिले आहेत.

शहरातील खाजगी क्लिनिक व दवाखान्यात नागरिक सर्दी, खोकला, ताप आल्याने तपासणीसाठी जातात आणि औषधे घेतात. कोरोना आणि फ्लू सदृश्य इतर अजारांची लक्षणे सारखीच असल्याने नेमका कोणता आाजार संबंधीताला झाला आहे, हे कळत नाही. कोरोना असल्यास संबंधीतांकडून संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील रूग्णांची माहिती मागविण्याचे ठरविले आहे.

रूग्णांची माहिती संकलित करण्यासाठी, सर्व क्षेत्रिय कार्यालयातील आरोग्य निरिक्षक तसेच सर्वेक्षणातील कर्मचारी यांनाही या बाबतचे आदेश देण्यात आले आहेत़ यात संबंधित अधिकारी/कर्मचारी यांनी आपल्या नियंत्रणाखालील कार्यक्षेत्रातील सर्व खाजगी दवाखाने, क्लिनिक व डिस्पेन्सरी येथे वैयक्तिकरित्या जाऊन, सदर माहिती संकलित करण्याबाबत सूचित करावे़  तसेच दैनंदिन स्वरूपात संकलित झालेल्या माहितीच्या आधारे संशयित रूग्णांच्याबाबतीत योग्य ती कार्यवाही करावी, असेही सांगण्यात आले आहे़

त्यानुसार शहरातील सर्व खाजगी दवाखाने, क्लिनिक व डिस्पेन्सरीमध्ये फ्लूची लक्षणे असलेल्या रूग्णांची माहिती संबंधित आस्थापना व डॉक्टरांना ठेवावी लागणार आहे़  तसेच ती दैंनदिन स्वरूपात संबंधित क्षेत्रिय कार्यालयांकडील क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे ईमेलव्दारे कळवावी लागणार आहेत़  यात रूग्णाचे नाव, वय, लिंग, पत्ता, मोबाईल क्रमांक, आजाराचा प्रकार, ऑक्सिजनची पातळी व अन्य आजार ही माहिती नमूद करणे गरजेचे असल्याचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ मनिषा नाईक यांनी सांगितले आहे.