इथेनॉल निर्मिती वाढवणार ; शरद पवार यांची माहिती

पुणे : यावर्षी साखरेचे २५ ते ३० टक्के उत्पादन कमी करून, त्याएैवजी इथेनाॅल निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहीती राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष आणि वसंतदादा शुगर इन्सि्टट्युटचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे स्पष्ट केले. मांजरी येथे साखर कारखानदारांच्या बैठकीनंतर पवार हे पत्रकारांशी बाेलत हाेते. ते म्हणाले, ‘‘ यंदा उसाचे उत्पादन वाढणार आहे. गाळप कसे करायचे हा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेला उठाव नाही अशा परिस्थितीत आगामी हंगामात साखरेचे उत्पादन २५ ते ३० टक्के कमी करून त्याऐवजी इथेनाॅल निर्मितीला प्राधान्य दिले जाईल. साखरेला जितकी किंमत मिळते तितकेच उत्पन्न इथेनॉल निर्मितीमधून मिळेल. इथेनाॅल निर्मितीला वेळ कमी लागत असल्याने त्याचा अप्रत्यक्ष फायदा हाेईल असेही त्यांनी नमूद केले.
केंद्र सरकारने इथेनॉल बाबत जाहीर केलेले धोरण अनुकूल असून साखर उत्पादन कमी करणार असल्याची माहीती सरकारला कळविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने नुकतेच जे कृषी विषयक निर्णय घेतले त्याबद्दल आमची नाराजी आहे. या विधेयकांच्या विराेधात पंजाब, हरीयाणा येथे लोक रस्त्यावर आले. एकीकडे शेतकऱ्यांना मोकळीक दिली म्हणतात दुसरीकडे कांदा निर्यातबंदी केली यात विसंगती आहे असेही मत त्यांनी मांडले.