‘हे तर मूर्खपणाचं लक्षण, मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तीच असं करू शकतात’ पांचजन्यच्या त्या लेखावर इन्फोसिसचं उत्तर

इन्फोसिसचे माजी सीएफओ टी. व्ही. मोहनदास पै यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, “हा लेख माथेफिरु विचाराच्या काही मंडळींकडून लिहिण्यात आला आहे. इन्फोसिस कंपनी नेहमीच देशाच्या व देशहिताच्या बाजूने उभी राहिलेली आहे.

  इन्फोसिस Infosys ही नामांकीत सॉफ्टवेअर कंपनी It company नक्षलवादी आणि तुकडे-तुकडे गॅंगला मदत करत असल्य़ाचा आरोप पांचजन्य panchajanya या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या RSS मासिकातून करण्यात आला. या लेखाला आता इन्फोसिसकडून उत्तर देण्यात आलं आहे. “असे प्रकार मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तीच करू शकतात.” असं म्हणत इन्फोसिसचे माजी सीएफओ टी. व्ही. मोहनदास पै यांनी खरमरीत समाचार घेतला आहे.

  काय म्हटलंय इन्फोसिसने

  इन्फोसिसचे माजी सीएफओ टी. व्ही. मोहनदास पै यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, “हा लेख माथेफिरु विचाराच्या काही मंडळींकडून लिहिण्यात आला आहे. इन्फोसिस कंपनी नेहमीच देशाच्या व देशहिताच्या बाजूने उभी राहिलेली आहे. जर पोर्टलने त्यांना अपेक्षित सेवा दिली नसेल तर त्याबाबतीत तक्रार करणे, टीका होणे ही एक सामान्य बाब आहे. पण, कामाच्या बाबतितील राग मनात ठेऊन संस्थेच्या देशप्रेमावर शंका घेतली जात असेल, संस्थेला देशद्रोही ठरवले जात असेल तर, हे मूर्खपणाचे लक्षण आहे.”

  “इन्फोसिस कंपनी कुठल्यातरी कटाचा भाग असल्याचा आरोप करणं, कंपनी देशाच्या अर्थव्यवस्थेला जाणीवपूर्वक अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करणं हे असे प्रकार मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तीच करू शकतात.” असं म्हणत इन्फोसिसचे माजी सीएफओ टी. व्ही. मोहनदास पै यांनी खरमरीत समाचार घेतला आहे.

  ‘पांचजन्य आमचं नव्हेच’ RSS ने केले हात वर

  “एक भारतीय कंपनी म्हणून, इन्फोसिसचे भारताच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे. जाणाऱ्या पोर्टलबाबत काही समस्या असू शकतात, परंतु पांचजन्यमध्ये या संदर्भात प्रकाशित झालेले लेख लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत आणि ते हे संघाचे मुखपत्र नाही. त्यामुळे या लेखाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडू नये.” असं संघाचे अखील भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर यांनी म्हटलं आहे.