चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु

मंचर : आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथे चक्रीवादळाने घरांचे व गोठयांचे उडून गेलेल्या छप्परांचे तसेच शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे मंगळवार (दि.९) रोजी करण्यात आले. निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार

मंचर : आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथे चक्रीवादळाने घरांचे व गोठयांचे उडून गेलेल्या छप्परांचे तसेच शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे मंगळवार (दि.९) रोजी करण्यात आले. निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला असून फळझाडे,आंबा,डाळींब यांचे नुकसान झाले आहे.चक्रीवादळाने शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत होऊन शेतकऱ्यांच्या समोर संकट उभे राहिले असून त्याच्या हाता तोंडाशी आलेली पिके आडवी झाली आहेत.

नुकसानीची तीव्रता अधिक असल्याने ऐन उन्हाळ्यात जगवलेली बाजरी, तरकारी व चारा पिके उध्दवस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरवला आहे.त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने बळीराजाचे छप्परही निसर्ग चक्रीवादळाने हिरावून घेतले आहे. शिंगवे येथील कामगार तलाठी सरस्वती पोंदे, कृषी सहायक संजय घुले व कोतवाल हिरामण पंडीत यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामे सुरु केले आहेत.