संस्थांनी आर्थिक उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याची आवश्यकता

हवेली तालुकाप्रमुख प्रशांत काळभोर यांचे मत
लोणी काळभोर : व्यावसायिक स्पर्धेत टिकण्याची असेल तर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी वेगवेगळे व्यवसाय सुरू करुन आर्थिक उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याची आवश्यकता आहे,असे मत शिवसेनेचे हवेली तालुकाप्रमुख प्रशांत काळभोर यांनी व्यक्त केले.

लोणी काळभोर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्यावतीने ना नफा ना तोटा तत्वावर दोन नवीन व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. शेतकरयांना वाजवी दरात खत पुरवठा व जाहिरात करण्यासाठी दोन एलईडी संच गावामध्ये बसवण्यात आले आहेत. हे दोन्ही व्यवसाय आर्थिकदृष्ट्या सहकारी बाजारसक्षम होण्यासाठी दोन संचालक मंडळे नियुक्त करण्यात आली आहेत. या संचालक मंडळाचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष नंदू पाटील काळभोर, यशवंत कारखान्याचे माजी संचालकशिवाजी काळभोर, प्रताप बोरकर,संस्थेचे अध्यक्ष राहुल काळभोर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय गायकवाड, साधना सहकारी बँकेचे संचालक सुभाष काळभोर, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब काळभोर, पांडुरंग केसकर, विजय ननवरे, माजी उपसरपंच सुभाष काळभोर, इंद्रभुज काळभोर, सर्व संचालक उपस्थित होते.

-संचालक मंडळाचा सत्कार
राहुल काळभोर म्हणाले की, संस्थेच्या खत विभागाने गेल्या तीन महिन्यांत सभासद, शेतकऱ्यांंना १०० टन रासायनिक खते नाममात्र करून दिली आहेत. संस्थेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी वेगवेगळे उपक्रमही हाती घेतले आहेत. जाहिरात विभागही त्यामुळेच तयार करण्यात आला आहे. आगामी काळात गॅस एजन्सीसारखे संस्थेला हमखास उत्पन्न मिळवून देणारे उपक्रम संस्था राबवणार आहे.