आमदार रोहित पवार यांच्याकडून महापुरुषांचा अवमान : उपनगराध्यक्ष नामदेव राऊत

कर्जत : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीमहाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांती सुर्य महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डाॅ. ए पी जे अब्दूल

कर्जत :   महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीमहाराज,  भारतीय घटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांती सुर्य महात्मा जोतिबा  फुले,  भारतरत्न डाॅ. ए पी जे अब्दूल कलाम व इतर महापुरूषांचा आमदार रोहीत पवार यांनी अवमान केला असून या प्रकरणी त्यांचा आम्ही निषेध करत असून या विरोधात विविध सामाजिक संघटना व नागरिकांनी निषेध करावा असे, आवाहन ही नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी केले आहे. राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आमदार रोहीत पवार हे सुडाचे राजकारण करत आहेत.  रोहित पवार यांनी महापुरुषांच्या स्मारकाचा व महापुरुषांच्या चौक सुशोभीकरणचा निधी हा गटाराकडे निधी वळवला आहे. 

या पत्रामध्ये राऊत यांनी पुढे म्हटले आहे कि, २७ मार्च २०१८ साली तत्कालीन पालकमंत्री प्रा राम शिंदे व मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी नगरपरीषदांना वैशिष्ठपुर्ण कामासाठी विशेष अनुदान योजने अंतर्गत १० कोटी रूपये निधी कर्जत नगर पंचायतीस दिला होता यामध्ये व्यापारी संकूल उभारणी ७ कोटी व चैाक सुशोभिकरण २ कोटी, रस्ते विकास १ कोटी यांचा समावेश होता.

कर्जत नगर पंचायतीने चैाक सुशोभिकरणामध्ये छत्रपती शिवाजीमहाराज , भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, डाॅ ए पी जे अब्दूल कलाम महासती अक्काबाई तसेच इतर महापुरूषांच्या नावाने प्रस्ताव तयार करून पाठवले होते याचे डिझाईन तसेच पुतळे व इतर साहित्य यांची नोंदणी केली होती आणि यास जिल्हाधिकारी यांनी २५ मार्च २०१८ या दिवशी मंजुरी आदेश दिला होता. मात्र कर्जत शहरातील मुख्य रस्त्याचे रूंदीकरण काम होत आहे याआगोदर कामे केल्यास अडचण होणार होती व हे  कामे रस्ता रूंदीकरण करताना अडथळा ठरले असते म्हणून रस्ता रूंदीकरण  पुर्ण झाल्यावर हे चौक सुशोभिकरण करण्याचा ठरले यामध्ये मुख्य रस्ता वगळता इतर रस्त्यावरील कामे पुर्ण करण्यात आली आहेतपंरतु यादरम्यान विधानसभेची निवडणूक झाली या मतदार संघामधून आमदार रोहीत पवार हे निवडून आले मात्र त्यांच्या विरोधात आम्ही  प्रा. राम शिंदे यांचे काम केल्याचा राग मनात ठेवून सुडबूध्दीने त्यांनी २७ मार्च २०१८ रेाजी मिळालेला सर्व निधी अनाधिकारने व सत्तेचा गैरवापर करीत रद्द केला आणि हा सर्व निधी त्यांनी गटारी आणि रस्ते दुरूस्ती साठी वापरण्यास मंजुरी देखील २० जुन २०२० रोजी आणली आहे मात्र हे करताना त्यांनी या राज्यातील, तालुक्यातील व शहरातील तमाम नागरीकांचे दैवत असणारे छत्रपती शिवाजीमहाराज, डाॅ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, डाॅ ए पी जे अब्दूल कलाम व इतर महापुरूषांचा आमदार रोहीत पवार यांनी गटार आणि रस्ते यांचेशी तुलाना करीत अवमान केला आहे याचा मी निषेध करतो. या प्रकरणी त्यंानी जनतेची माफी मागावी व महापुरूषांच्या सुशोभिकरणाचा निधी परत वर्ग करावा, अशी ही मागणी राऊत यांनी केली आहे. 

सुशिक्षित बेरोजगार युवकांचे शाॅपिंग काॅम्पलॅक्स रद्द

कर्जत शहरात सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वतः च्या पायावर उभा राहता यावे यासाठी नगर पंचायतीने  युवकांसाठी शाॅपींग सेंटर बांधकाम करण्याचा प्रस्ताव तयार केला होता या काॅम्पलॅक्स च्या माध्यमातून कर्जत शहरातील युवक आणि बेरोजगांरा आपला व्यवसाय करून  पायावर उभा रहातील याची काळजी आम्ही घेतली होती. या प्रस्तावाला जिल्हाधिकारी यांनी १८ जून २०२०या दिवशी ७ कोटीची मान्यता देत २ कोटी ४६ लाख ६७ रूपये निधी देखील मंजुर केला तसेच याची निवीदा प्रसिध्द केली असे असताना या कामातही  आमदार रोहीत पवार यांनी सत्तेचा गैरवापर करीत हा निधी वळवला आहे. सुशोभीकरणआणि शाॅपींग काॅम्पलॅक्स ही कामे चिरकाल टिकणारी असतानाही आमदार पवार यांनी हा निधी गटर आणि रस्ते यांना दिला ही बाब आतिशय आविचारी आणि बेरोजगार युवक यांचेवर अन्याय करणारी आहे.

कर्जत नगरपंचायतीस मंजुर १० कोटी रूपये निधीचे आंदाजपत्रक तयार करून त्यांस तांत्रीकमान्यतेसाठी कार्यकारी आभियंता प्रािधकरण विभाग यांचे कडे पाठविला त्यासाठी 1 टक्का रक्कम म्हणजे १० लाख रूपये देखील भरले आहेत यानंतर या सर्व कामांची अंदाजपत्रकते तयार करून त्यास तांत्रीक मान्यता घेतलेली असतानाही ही कर्जत शहराच्या विकासाची कामे जी सन २०१८ मधील मंजुर असताना ८ कोटी ६२ लाख रूपयांची कामे रद्द करण्याचा २४ जून रोजी आदेश काढून आमदार पवार यांनी रद्द करून कर्जत शहराच्या विकासात खोडा घालण्याचे पाप केले आहे.तसेच कर्जत नगर पंचायत ही स्वायत्त संस्था असताना तिला नष्ट करण्याचा चंग पवार यांनी बांधला आहे असा आरोपही नामदेव राउत यांनी केला आहे विशेष म्हणजे या कामांसाठी खासदार डाॅ सुजय विखे पाटील यांनी देखील पत्रव्यहार केला होता मात्र त्यांना देखील रोहीत पवार यांनी जुमानले नाही.

यामुळे आमदार रोहीत पवार हे जाणीव पुर्वक कर्जत शहराचा विकासात अडकाठी आणीत असून यासाठी त्यांनी महापुरूषांचा देखील अवमान केला आहे या प्रकरणी त्यांनी जनतेची माफी मागून पुर्ववत सर्व कामे मंजुर करावीत अशी मागणी ही नामदेव राऊत यांनी केली आहे.