सलुन व्यवसायिकांच्या मागण्यांबाबत लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन

गणपतराव क्षीरसागर यांचा इशारा मंचर : गेल्या तीन महिन्यापासुन लॉकडाऊनमुळे सलुन व्यवसायिकांचे व्यवसाय बंद आहे. उपासमारीची वेळ आली असतानाही सरकार मात्र लक्ष द्यायला तयार नाही. राज्य सरकारने सलुन

गणपतराव क्षीरसागर यांचा इशारा

मंचर : गेल्या तीन महिन्यापासुन लॉकडाऊनमुळे सलुन व्यवसायिकांचे व्यवसाय बंद आहे. उपासमारीची वेळ आली असतानाही सरकार मात्र लक्ष द्यायला तयार नाही. राज्य सरकारने सलुन व्यवसायिकांच्या मागण्यांबाबत लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल,असा इशारा मंचरचे माजी उपसरपंच सलुन व्यवसायिक संघाचे अध्यक्ष गणपतराव क्षीरसागर यांनी बुधवारी दिला.

मंचर (ता.आंबेगाव) येथे सलुन व्यवसायिकांनी खिशाला काळ्या फिती बांधुन सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. सरकारने नाभिक समाजातील सलुन व्यवसायिकांना पॅकेज द्यावे,अशी मागणी करण्यात आली. राज्यशासन नाभिक समाजाकडे दुर्लक्ष करत असल्याच्या आरोप नाभिक समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी नाभिक संघटनेचे आंबेगाव तालुकाध्यक्ष गणपत क्षीरसागर,उल्हास क्षीरसागर,संजय गायकवाड,सतिश नेवकर,विनायक भोर,नवनाथ क्षीरसागर,संतोष गायकवाड,गणेश आतकर यांनी खिशाला काळ्या फिती बांधुन घोषणाबाजी करुन सरकारचा निषेध केला. सरकारने तातडीने सलुन व्यवसायिकांच्या मागण्यांबाबत लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपाध्यक्ष रत्नाकर कोऱ्याळे यांनी दिला.