पांढरेवाडी ग्रामपंचायतीत सरपंचाच्या पतीचे ग्रामपंचायत कारभारात हस्तक्षेप

कुरकुंभ :दौंड तालुक्यातील पांढरेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच छाया नानासो झगडे यांचे पती नानासो झगडे यांचा ग्रा.पं. कामकाजातील हस्तक्षेपावर आक्षेप घेत मनमानी कारभार चालविला असल्याची तक्रार इतर

कुरकुंभ :दौंड तालुक्यातील पांढरेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच छाया नानासो झगडे यांचे पती नानासो झगडे यांचा  ग्रा.पं. कामकाजातील हस्तक्षेपावर आक्षेप घेत मनमानी कारभार चालविला असल्याची तक्रार इतर ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकार्‍यांकडे केली आहे, 

दौंड तालुक्यातील पांढरेवाडी ग्रामपंचायत सरपंच छाया  झगडे यांचे पती नानासो झगडे हे औद्योगिक वसाहतीमधील अनेक कंपन्यांत ठेकेदार आहेत. पंचायत राज व्यवस्थेत महिलांच्या अधिकारावर गदा आणून त्यांच्या कामात  ढवळाढवळ करण्यावर सरकारने बंदी घातली आहे,परंतु ग्रामपंचायत पांढरेवाडी चे सरपंच यांचे पतीचा ग्रामपंचायत कारभारामध्ये अनावश्यक हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ग्रामपंचायत कामगारांना विनाकारण अधिकार नसताना सूचना देत आहेत, तसेच ग्रामपंचायत मध्ये येऊन  ग्रामपंचायतच्या कागदपत्रांची तपासणी करत आहेत, तर काही सदस्यांना आमंत्रित करून रात्री-अपरात्री ग्रामपंचायत कार्यालयात बैठका घेत आहेत, ग्रामपंचायतच्या विकास कामात त्यांचा काही संबंध नसताना ठेकेदार यांना परस्पर कामामध्ये बदल व सूचना करायला सांगतो. 

झगडे हे आपल्या सरपंच पत्नीचा अधिकार हिरावून घेऊन स्वत:च ग्रामपंचायतवर पुरुष व त्यांचे प्रतिनिधी अधिराज्य गाजवित असून, ग्रामपंचायतच्या मासिक बैठकीत मंजुर विषय त्यांचा पती परस्पर बदल करत आहेत, तसेच मासिक सभे मध्ये नियमानुसार आलेले बिल मंजूर झाले असताना ही महिला सरपंच यांचे पती ग्रामसेवक यांना सांगून बिल मंजूर करण्यास अडचणी निर्माण करतात.

ग्रामपंचायत सदस्यांच्या अधिकारावर गदा निर्माण करून सदस्यांना अरेरावाची भाषा वापरणे, तसेच ग्रामस्थांनी माहिती विचारली असता ग्रामसेवक महिला सरपंच यांच्या पतीकडे बोट दाखवत आहे, महिला सरपंच मासिक सभेला हजर असताना इतर वेळी ग्रामपंचायतचा कारभार पतीच हाकत आहेत, संबंधित ग्रामपंचायत सदस्य याना न विचारता ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या एमआयडीसी परिसरात नवीन खासगी कंपनीला परस्पर ना-हरकत दाखला देण्यात येतो अशी तक्रार ग्रामपंचायत सदस्य विशाल जगताप व संतोष चव्हाण यांनी गट विकास अधिकारी गणेश मोरे यांच्याकडे  करून कारवाईची मागणी केली आहे,

“या संदर्भात विस्तार अधिकारी यांना  चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहे. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.”

-गणेश मोरे , गटविकास अधिकारी दौंड पंचायत समिती

या पत्रासंदर्भात सरपंच छाया झगडे यांना विचारले असता त्यांना (पतीला) फोन करा असे सांगितले