भोरमध्ये कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या ११ जणांची तपासणी

भोर : तालुक्यातील रायरीच्या रेणुसेवाडी येथील एका करोना बाधीत रूग्णांच्या संपर्कात आलेल्या ११ जणांना शुक्रवारी तपासणीसाठी पुण्यात पाठवल्याचे उपविभागीयअधिकारी राजेंद्र जाधव यांनी सांगितले.सोमवारी

भोर : तालुक्यातील रायरीच्या रेणुसेवाडी येथील एका करोना बाधीत रूग्णांच्या संपर्कात आलेल्या ११ जणांना शुक्रवारी तपासणीसाठी पुण्यात पाठवल्याचे उपविभागीयअधिकारी राजेंद्र जाधव यांनी सांगितले.सोमवारी दुपारी गुरूवारी दुपारी छत्तीस वर्षाचा एकरूग्णांचा वैदयकीय तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आढळळा आहे.सध्या त्याच्यावर पुण्यातील खाजगी रूग्णालयांत उपचार सुरू आहेत.खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने आकरा जणांना तपासणीसाठी पुण्याला पाठवल्याचे तालुका वैदयकीय अधिकारी डॉ.सुनिल क-हाळे यांनी सांगितले.

शनिवारपासून बस सेवा.

तालुक्यातील कंटेन्मेंट झोन वगळून इतर भागात शनिवारी बस सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे आगारप्रमुख बालाजी सूर्यंवंशी यांनी सांगितले. त्यानुसार एक दोन भागांत बस सोडून प्रवाशांचा प्रतिसाद पाहून फे-या वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.