पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांच्या घरात  फक्त ‘पाणीच’

पारगाव : गणेशरोड नानगाव ता.दौंड येथे (ता,१४) रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात खूप मोठे नुकसान झाले आहे.२२ नंबर फाटा वितरिका येथून आलेल्या कॅनॉल द्वारे पूर्वी पासून शेतजमिनीला या पाण्याचा उपयोग केला जात होता.मध्यंतरी ज्यांच्या शेतामधून हा कॅनॉल गेला होता त्या लोकांनी पाण्याची उपलब्धता तयार केल्यानंतर कालांतराने हा कॅनॉल बुजवून अतिक्रमणे केली होती.

ज्या शेतकऱ्यांना या कॅनॉलची गरज होती त्या शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पाटबंधारे विभागामार्फत अतिक्रमणे हटवून कॅनॉलची दुरुस्ती करून वहिवाटीस तयार करून देण्यात आला होता.परंतु पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीमुळे अर्ध्यावरतीच कोणताही नियम नसताना ‘टेल’ हा खाजगी जागेवर शेतकऱ्यांच्या शेतात सोडून दिला आहे.नियमाप्रमाणे ‘टेल’ हा ओढा,नाला,नदी याठिकाणी ठिकाणी सोडणे अनिवार्य असते.

पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे येथील शेतकऱ्यांच्या फ्लावर,मका,ऊस,कांदा ई पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे.घरे,जनावरांचा गोठा,दुध डेअरी अद्याप पाण्याखाली आहे.घरातील जीवनाश्यक वस्तू पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या आहेत.गणेशरोड नानगाव येथील शेतकरी बबन रासकर,नामदेव रासकर,महादेव रासकर,ज्ञानदेव रासकर,कैलास आढागळे,बाळासो आढागळे,सोपान आढागळे,दिलीप पवार,रघुनाथ गुंड,ज्ञानदेव पवार,तुकाराम पवार गट क्रमांक १८४,१८३,१८२,१८५ प्रमाणे आदि शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत.

“पाटबंधारे विभागाच्या चुकीमुळे आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.तीन दिवस झाले माझे घर पाण्यात आहे.साप,विंचू भयावह या परीस्थित या घरात राहणे मुश्कील झाले आहे”

– पार्वती आढागळे ( शेतकरी )

“फ्लावर,कांदा,मका,ऊस पिकांचे नुकसान झाले आहे.बेजबाबदार पाटबंधारे विभागाच्या आडमुठेपणामुळे आमच्या घरात,शेतात,जनावराच्या गोठ्यात पाणीच पाणी झाले आहे”

– बबन रासकर (शेतकरी)

१९६५ ब्रिटिश कालीन पासून हा कॅनॉल आहे.'टेल' हा लिफ्टमध्ये सोडण्यात आलेला होता.परंतु येथील शेतकऱ्यांनी त्यावर अतिक्रमण करून बुजवला आहे.

एस. एम.बनकर , अभियंता पाटबंधारे विभाग,यवत