हिंदू आणि तत्सम जातींबाबत अश्लील लिखाण करणाऱ्याला ज्ञानपीठ देणे योग्य आहे का? – ॲड. रमेश राठोड

या पुस्तकामध्ये भालचंद्र नेमाडे यांनी बंजारा समाजातील स्त्रियांना वेश्या संबोधले आहे. तसेच ' ह्या लभान्या बायांच्या घरात पुरुष मानस फार टिकत नव्हती. बायांच्या पैसावर जुगार खेळणं, दारू पिणं' अशाप्रकारचे लिखाण करून समाजातील पुरुषांना खालचा दर्जा दाखवण्यात आला. त्यामुळे या लेखकास साहित्य क्षेत्रातील उच्च पुरस्कार देणे योग्य नाही.

    पुणे: ‘हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ’ या पुस्तकातून अश्लील लिखाण करून तत्सम जातींबाबत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला ज्ञानपीठ देणे योग्य आहे का? हा प्रश्न बंजारा समाजाने केला आहे.
    या पुस्तकामध्ये भालचंद्र नेमाडे यांनी बंजारा समाजातील स्त्रियांना वेश्या संबोधले आहे. तसेच ‘ ह्या लभान्या बायांच्या घरात पुरुष मानस फार टिकत नव्हती. बायांच्या पैसावर जुगार खेळणं, दारू पिणं’ अशाप्रकारचे लिखाण करून समाजातील पुरुषांना खालचा दर्जा दाखवण्यात आला. त्यामुळे या लेखकास साहित्य क्षेत्रातील उच्च पुरस्कार देणे योग्य नाही, असे राठोड यांनी परिषदेत सांगितले. लेखकांबाबत तक्रार करूनही याबद्धल कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे लवकरात लवकर नेमाडेंवर गुन्हा नोंदवावा, असे राठोड म्हणाले.