corona

राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस विदारक बनत चालली आहे. पुण्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे पुण्यातील रुग्णालयेही आता अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे रुग्णांना ठेवण्यासाठी हॉटेल्स भाड्याने घेण्याची वेळ रुग्णालयांवर आलीय. अशावेळी पुण्यातील कोरोनाचा सामना करण्यासाठी आता भारतीय लष्कराची मदत घेतली जाणार आहे.

  पुणे: पुण्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा अपुरी पडू लागल्याने आता प्रशासनाकडून नवा मार्ग चाचपून पाहिला जात आहे. अनेक रुग्ण कोरोना झाल्यानंतर सरकारी रुग्णालय किंवा कोव्हिड सेंटरऐवजी घरीच राहून उपचार करण्यासाठी आग्रही असतात. मात्र, कोरोनाचा वाढता प्रकोप पाहून सरकारने होम क्वारंटाईनचा पर्याय बंद केला होता. मात्र आता पुणे महागनरपालिकेने पुन्हा होम आयसोलेशन आणि क्वारंटाईनचा पर्याय सुरु केला आहे. त्यासाठी पालिका संबंधित रुग्णांकडून २५ हजारांचे बाँड सही करुन घेणार आहे. त्यानंतरच रुग्णांना किंवा कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय असलेल्या लोकांना होम आयसोलेशनमध्ये राहता येईल.

  होम आयसोलेट असताना फिरल्यास २५ हजारांचा दंड
  कोरोना झाल्यांनतर रुग्णाला होम आयसोलेशनमध्ये राहण्यास परवानगी मिळाली असेल आणि त्यांनंतर जर रुग्ण बाहेर फिरताना आढळून आल्यास त्यांच्याकडून २५ हजार रुपये वसूल केले जातील. यासाठी होम क्वारंटाईनमध्ये असणाऱ्या रुग्णांकडून पालिका २५ हजार रुपयांचा बाँड सही करुन घेणार आहे.

  पुण्यातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढली
  पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्याच्या घडीला पुणे शहरात ४५ हजार अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी सुमारे ३८,४०१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. ही संख्या अशीच वाढत राहिल्यास आगामी काळात पुणे जिल्ह्यात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्स बेडसचा तुटवडा जाणवण्याची दाट शक्यता आहे.

  कोरोना संकटातून वाचण्यासाठी आता लष्कराची मदत घेतली जाणार