पुणे पोलिसांच डोकं ठिकाणावर आहे का..? ; वाहतूक पोलिसांच्या ‘त्या’ कारवाईमुळे प्रचंड गोंधळ

वाहतूक शाखा आणि पुणे पोलीस दलात कायम व वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असणाऱ्या समर्थ वाहतूक विभागात हा प्रकार घडला आहे. त्यामुळे शहरभर वाहतूक पोलीस कारवाई करतात, त्यांच्याकडून कसे काही होत नाही. पण, याच वाहतूक विभागात कायम गोंधळ कसा उडतो अशी चर्चा पोलीस दलात आहे.

    पुणे : पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखा पोलिसांच डोकं ठिकाणावर आहे का, असेच प्रत्येकजण हा फोटो पाहून म्हणत असेल. कारण, नो पार्किंगमध्ये दुचाकी उभी असल्याने ती उचलण्यात येत होती. पण, दुचाकी चालक पळत आला आणि तो दुचाकीवर बसला. त्यानं गाडीला उचलण्यास विरोध केला. पण, कारवाईला मागे हटतील ते पुणे पोलीस कसले. त्यांनी दुचाकी त्या चालकासह उचलली आणि थेट व्हॅनवर ठेवली. भरदिवसा हे सुरू होते. मग मात्र नागरिकांची चिडचिड झाली व येथे घोळकाच जमा झाला. त्यानंतर काही तास गोंधळ सुरू होता. तो व्यक्ती व्हॅनवर बसूनच वाहतूक पोलिसांना बोलत होता. यावेळी त्यांच्यात वाद झाले. मात्र यामुळे पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाचे डोकं ठिकाणावर आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे.

    कारवाई होणार तरी कोणावर
    वाहतूक शाखा आणि पुणे पोलीस दलात कायम व वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असणाऱ्या समर्थ वाहतूक विभागात हा प्रकार घडला आहे. त्यामुळे शहरभर वाहतूक पोलीस कारवाई करतात, त्यांच्याकडून कसे काही होत नाही. पण, याच वाहतूक विभागात कायम गोंधळ कसा उडतो अशी चर्चा पोलीस दलात आहे. त्यातही या पोलीस निरीक्षक यांच्यावर दोन वेळा अदखलपात्र गुन्हे दाखल झालेले असताना कसलीच कारवाई न झाल्याने वरिष्ठ अधिकारी नेमके इतके मेहरबान का आहेत, असेही चर्चा सुरू आहे.