पुण्यातील ‘त्या’ आयटी इंजिनिअरचा खून झाल्याचे स्पष्ट

गणेश हे कोंढवा बुद्रुक येथील सण फ्लॉवर सोसायटीत राहण्यास आहेत. त्यांचा १६ वर्षापुर्वी विवाह झालेला आहे. त्यांना १४ वर्षांचा मूलगा आहे. ते आयटी इंजिनिअर होते. एका खासगी कंपनीत नोकरी करत होते. त्यांची पत्नी गेल्या एक वर्षापासून माहेरी राहत आहेत. गणेश हे एकटेच राहत होते. आरोपी व गणेश हे मित्र आहेत. रविवारी दुपारी तिघे गणेश त्यांच्या घरी पार्टी करत होते. 

    पुणे : पुण्यातील कोंढव्यात “त्या” आयटी इंजिनिअरचा खून झाल्याचे स्पष्ट झाले असून, पोलिसांनी चौकशीनंतर हा प्रकार उघडकीस आणला आहे. तीन दिवस पोलीस वेगवेगळ्या शक्यता गृहीत धरून त्याचा तपास करत होते. दोघांना अटक केली आहे. अखेर हा खुन असल्याचे समोर आले आहे. आयटी इंजिनिअर मित्रांसोबत घरीच दारू पार्टीला बसल्यानंतर दुसऱ्या दिवशी रक्ताच्या थारोळ्यात दुसऱ्या दिवशी मृतदेह आढळून आला होता.

    सागर दिलीप बिनावत (वय ३३) आणि दत्तात्रय देविदास हजारे (रा. कोंढवा) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याघटनेत गणेश यशवंत तारळेकर (वय ४७) या आयटी इंजिनिअरचा खून झाला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश हे कोंढवा बुद्रुक येथील सण फ्लॉवर सोसायटीत राहण्यास आहेत. त्यांचा १६ वर्षापुर्वी विवाह झालेला आहे. त्यांना १४ वर्षांचा मूलगा आहे. ते आयटी इंजिनिअर होते. एका खासगी कंपनीत नोकरी करत होते. त्यांची पत्नी गेल्या एक वर्षापासून माहेरी राहत आहेत. गणेश हे एकटेच राहत होते. आरोपी व गणेश हे मित्र आहेत. रविवारी दुपारी तिघे गणेश त्यांच्या घरी पार्टी करत होते.

    दरम्यान, सोमवारी दुपारी कोंढवा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली होती. त्यानंतर कोंढवा पोलिसांनी येथे धाव घेतली होती. मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला होता. अहवालात संशयास्पद गोष्टी समोर आल्या होत्या. त्यादरम्यान पोलिसांनी पार्टीसाठी आलेल्या सागर आणि दत्तात्रय यांना पकडून चौकशी सुरू केली होती. त्यावेळी त्यांनी पार्टी सुरू असतानाच अचानक गणेश यांनी डोक्यात गोळी झाडून घेतली, असे पोलीसांना सांगितले होते. परंतु, भितीपोटी आम्ही तेथून पळालो. तसेच, पिस्तुल देखील विहिरीत टाकून दिल्याचे सांगितले होते. त्यामुळे ही आत्महत्या की खून असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांना देखील याचा गुंता सुटत नव्हता. आरोपी घटना सांगत होते, त्यानुसार ती आत्महत्या आहे असेच वाटत होते. मात्र पोलिसांना यात काही तरी गडबड असल्याचा संशय होता. त्यामुळे पोलीस सर्व शक्यता गृहीत धरून तपास करत होते. या दोघांकडे गेल्या तीन दिवसांपासून कसून चौकशी सुरू होती. पोलीसीखाक्या दाखवताच या दोघांनी खुनाची कबुली दिली आहे. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी पिस्तुल विहिरीत टाकल्याची कबुली दिली आहे. खून का केला याचा उलघडा झालेला नसून, त्याबाबत चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांच्या अथक प्रयत्नांने हा गुन्हा उघडकीस आला आहे.