माझ्या आजोबांचं लिखाण आपल्याला हवं तसं घ्यायचं असं चालणार नाही ; राज ठाकरे यांचा शरद पवारांना टोला

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतर अजूनही आपण जातीपातीमध्ये खितपत पडलो आहोत. आजही निवडणुकीत भाषणं होतात तेव्हा सगळ्यांकडून सारखं रस्ते, पाणी, विज अशी तिच तिच आश्वासनं दिली जात आहेत. हे असे असेल तर मग मागील एवढ्या वर्षात आपण काय केलं हे शोधलं पाहिजे. साधारणपणे आपण ९९ साल पाहिलं तर त्यापूर्वी महाराष्ट्रात जातीपाती होत्याच. पण ९९ नंतर जातीपातींमध्ये द्वेष वाढला, हे माझं वाक्य होतं.

    महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणाविषयी राज ठाकरे यांनी एक मोठे वक्तव्य केले होते. राज ठाकरे यांनी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरलं होतं. “राज्यात जातीचा मुद्दा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आयडेंटिटीचा मुद्दा झाला आहे. राज्यात जातीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर मोठा झाला”, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर शरद पवारांनी “राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरेंचे विचार वाचावेत”, असा खोचक सल्ला राज ठाकरे यांना दिला होता.याला आज पुण्यात राज ठाकरे यांनी त्यांच्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले.

    काय म्हणाले राज ठाकरे?

    राज ठाकरे म्हणाले की, स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतर अजूनही आपण जातीपातीमध्ये खितपत पडलो आहोत. आजही निवडणुकीत भाषणं होतात तेव्हा सगळ्यांकडून सारखं रस्ते, पाणी, विज अशी तिच तिच आश्वासनं दिली जात आहेत. हे असे असेल तर मग मागील एवढ्या वर्षात आपण काय केलं हे शोधलं पाहिजे. साधारणपणे आपण ९९ साल पाहिलं तर त्यापूर्वी महाराष्ट्रात जातीपाती होत्याच. पण ९९ नंतर जातीपातींमध्ये द्वेष वाढला, हे माझं वाक्य होतं. राष्ट्रवादीच्या निर्माणानंतर तो वाढला असं मी म्हणालो होतो, असं राज ठाकरे म्हणाले.मला प्रबोधनकार वाचण्याचा सल्ला देण्यात आला. मी सर्वांची पुस्तकं वाचलेत. प्रबोधनकरांचं संदर्भ त्या त्या काळातले होते. माझ्या आजोबांचं लिखाण आपल्याला हवं तसं घ्यायचं असं चालणार नाही. मी यशवंतरावांचंही वाचलं आहे, त्यांचेही मत काय होतं हेही मला माहिती आहे, असा जोरदार टोला राज ठाकरे यांनी शरद पवारांना लगावलाय.