तलवार घेऊन व्हिडिओ व्हायरल करणे पडले महागात ; पोलिसांकडून तीन आरोपींना सापळा रचून अटक

पोलिसांना पालघन हातात घेऊन व्हिडिओ व्हायरल करणारा कुणाल जाधव हा वाघोली येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पालघन जप्त केली असून लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक गणेश माने आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

    पुणे: सोशल मिडियावर कोयते, तलवार, पालघन अशी हत्यारे हातात घेऊन व्हिडिओ बनवून व्हायरल करुन दहशत निर्माण करणार्‍या तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. नितिन सुंदर दहीरे (वय २२, रा. हडपसर), अनिकेत अशोक कुंदर (वय २२, रा. हडपसर) आणि कुणाल मोहन जाधव (वय २१, रा. वाघोली) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.
    गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकातील पोलिसांना तलवार व पालघन हातात घेऊन व्हिडिओ बनवून तो सोशल मिडियावर व्हायरल केले. दोघे हिंगणे मळा येथे फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नितीन दहिरे व अनिकेत कुंदर यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पालघन व तलवार मिळून आली. हडपसर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.