लग्नात डीजे वाजवणे पडले महागात ; नवरदेवास एकावर गुन्हा

सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील मोडवे गावात लग्नसमारंभासाठी डी. जे लावल्या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी नवरदेवास एकावर गुन्हा दाखल केला आहे. सागर गायकवाड (रा. राजपुरवस्ती, मोडवे), रणजित देवकुळे (रा. धनकवडी, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर गायकवाड यांनी आपल्या लग्न समारंभात रंजीत देवकुळे यांच्या मालकीची साऊंड सिस्टिम व लाईट लावून मोठ्या आवाजात गाणी लावली हाेती. ५० ते ६० हून अधिक नागरिक सामाजिक अंतर न राखता एकत्रित येऊन कार्यक्रम साजरा करीत हाेते. आपत्ती व्यवस्थापन विभागाचा आदेशाची पायमल्ली हाेत असल्याचे आढळून आले.या कारवाईत अंदाजे ४ लाख ५० हजार किमतीचे ४ साहित्य जप्त करण्यात अाले. वडगांव निंबाळकर  पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दिपक वारुळे पुढील तपास करीत आहेत.