घरकाम करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी जॅकी श्रॉफ पोहचला पुण्याला ; सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी केले कौतुक

दिपाली तुपे नावाची महिला जॅकी दादाच्या घरात अनेक दिवसांपासून काम करतात. त्यांची आजी तान्हाबाई ठाकर यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं.  जॅकी दादा मावळला गेला होता, त्यावेळी दिपाली यांच्या आजीचं १०० व्या वर्षी निधन झाल्याचं कळाताच त्याने दिपाली यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस केली.

    पुणे: कायम आपल्या हायफाय राहणीमानासाठी, पार्ट्या, खाणंपिणं यासाठी बॉलिवूडमधील कलाकार मंडळी ओळखले जातात. अनेक कलाकारांचा हळवापणा चाहत्यांचे मन जिंकतो. बॉलिवूडमधील जॅकी दादा हादेखील त्यापैकी एक!  सध्या सोशल मीडियावर जॅकी श्रॉफचं मोठ कौतुक होताना दिसत आहेत. याचं कारणही तसेच आहे. जॅकीदादाच्या घरात काम करणाऱ्या महिलेच्या आजीचं पुणे जिल्ह्यातील मावळ येथील पवनानगर येथे निधन झालं. याबद्दल कळताच घरकाम करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी जॅकी दादा पुण्याला पोहोचला.

    पुण्यातील मावळ येथील चांदखेड येथे जॅकीचा बंगला आहे.अनेकवेळा तो तेथे मुक्कामाला जातो. दिपाली तुपे नावाची महिला जॅकी दादाच्या घरात अनेक दिवसांपासून काम करतात. त्यांची आजी तान्हाबाई ठाकर यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं.  जॅकी दादा मावळला गेला होता, त्यावेळी दिपाली यांच्या आजीचं १०० व्या वर्षी निधन झाल्याचं कळाताच त्याने दिपाली यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस केली. अगदी साध्या मात्र आपल्या माणसाप्रमाणे तो त्यांच्या घरी गेला. जमिनीवर बसला आणि दिपालीच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी होत , त्यांचे सांत्वन केलं.