पुणे स्टेशन परिसरात प्रवाशांना लुटणारे जेरबंद ; बंडगार्डन पोलीस स्टेशनची कामगिरी

पोलिसांनी घटनेचे गांभिर्य ओळखुन लागलीच आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळया तीन टीम तयार करून तपास सुरु केला. दरम्यान पोलिसांना खबऱ्यामार्फत तीन आरोपी पुणे स्टेशन जवळील सम्राट हॉटेलचे बाहेर बसल्याची माहिती मिळाल. त्याप्रमाणे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सापळा रचुन, तिघांना रिक्षासह ताब्यात घेतले. त्यांचेकडे केलेल्या चौकशीत त्यांनी आणखी तिघांची नांवे सांगुन त्यांचे ठावठिकाणाबद्दल माहिती दिली.

    पुणे :  स्टेशन परिसरात प्रवाशांना लूटणाऱ्या व दरोडा टाकणाऱ्या टोळीस बंडगार्डन पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून दोन रिक्षा, सहा मोबाईल व रोकड हस्तगत करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार विजय पांडुरंग गुरव हे पहाटे ४. ३०वा.चे दरम्यान पुणे स्टेशन तुकारामशेठ शिंदे वाहनतळ येथे वाघोली येथे जाण्यासाठी रिक्षा शोधत होते. त्यावेळी त्याचे जवळ एका रिक्षा उभी राहिली रिक्षात अगोदरच एक प्रवासी बसलेला होता. त्यांनी वाघोलीला सोडतो असे सांगुन विजय गुरव यांना रिक्षात बसण्यास सांगितले.

    रिक्षा मालधक्का चौकाच्या दिशेने जात असताना, रिक्षात आणखी चौघेजण बसले, रिक्षा थोडी पुढे घेवुन गेले. रिक्षात बसलेल्यांनी विजय गुरव यांस रिक्षातुन खाली उतरवुन, लाथा बुक्‍यांनी मारहाण करून, चाकुने हातावर वार केला व रोख रक्कम, बॅग, मोबाईल काढुन घेतला. विजय गुरव यांनी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली.

    पोलिसांनी घटनेचे गांभिर्य ओळखुन लागलीच आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळया तीन टीम तयार करून तपास सुरु केला. दरम्यान पोलिसांना खबऱ्यामार्फत तीन आरोपी पुणे स्टेशन जवळील सम्राट हॉटेलचे बाहेर बसल्याची माहिती मिळाल. त्याप्रमाणे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सापळा रचुन, तिघांना रिक्षासह ताब्यात घेतले. त्यांचेकडे केलेल्या चौकशीत त्यांनी आणखी तिघांची नांवे सांगुन त्यांचे ठावठिकाणाबद्दल माहिती दिली. त्यांचा शोध घेण्यासाठी एक टीम रवाना केली असता, तिघांपैकी दोघे पुणे रेल्वे हॉस्पीटलचे जवळ दिसुन आले.

    पोलीसांना पाहुन ते पळुन जात असताना त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडण्यात आले आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार करीत असुन, आरोपींकडे केलेल्या तपासात आरोपींनी अशाप्रकारे आणखी गुन्हे केलेले असुन, आरोपींकडुन दोन रिक्षा, सहा मोबाईल, रोख रक्कम ताब्यात घेण्यात आलेली आहे