लग्नसोहळ्यात जोपासली सामाजिक बांधिलकी, काटे परिवाराकडून आरोग्य विभागास ऑक्सीजन कॉन्सेनट्रेटर भेट

पिंपळे सौदागर येथील पी के इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक जगन्नाथ काटे यांची कन्या प्रणिता व वाकड येथील अरुण पंढरीनाथ पवार यांचे चिरंजीव अक्षय यांचा विवाह सोहळा शनिवारी गोविंद गार्डन येथे कोरोनाविषयक नियमांचे पालन करून स्वकीयांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने संपन्न संपन्न झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने काटे परिवारातर्फे महापालिकेच्या आरोग्य विभागास दोन ऑक्सीजन कॉन्सेनट्रेटर भेट देण्यात आले.

    पिंपरी: राज्यातील कोरोनाचे सावट लक्षात घेऊन पिंपळे सौदागर येथील काटे परिवाराने अनावश्यक खर्च टाळून लग्नसमारंभादिवशी महापालिकेच्या आरोग्य विभागास ऑक्सीजन कॉन्सेनट्रेटर भेट देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

    सध्या आपला भारत देश कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसर्‍या लाटेचा सामना करत असून या संकट काळात माणुसकीची भावना आधिक बळकट होत असल्याचे दाखवून देणार्‍या अनेक घटना समोर येत आहेत. पिंपळे सौदागर येथील काटे परिवाराने देखील या महामारीच्या काळात मदतीचा हात देत समाजापुढे वेगळा आदर्श ठेवला आहे.

    पिंपळे सौदागर येथील पी के इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक जगन्नाथ काटे यांची कन्या प्रणिता व वाकड येथील अरुण पंढरीनाथ पवार यांचे चिरंजीव अक्षय यांचा विवाह सोहळा शनिवारी गोविंद गार्डन येथे कोरोनाविषयक नियमांचे पालन करून स्वकीयांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने संपन्न संपन्न झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने काटे परिवारातर्फे महापालिकेच्या आरोग्य विभागास दोन ऑक्सीजन कॉन्सेनट्रेटर भेट देण्यात आले.

    वधू- वरांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेल्या खासदार श्रीरंग बारणे व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते वैद्यकीय आधिकारी डॉ.पवन साळवे यांच्याकडे हे ऑक्सीजन कॉन्सेनट्रेटर सुपूर्द करण्यात आले. दरम्यान कोणताही बडेजाव न करता साध्यापद्धतीने लग्नसोहळा पार पाडत कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी काटे परिवाराकडून घेण्यात आलेल्या या स्त्युत्य निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.